Type Here to Get Search Results !

• प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा - भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ• वेळास येथे भंडारी समाज महिला मेळाव्यास उपस्थिती


• प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा - भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ

• वेळास येथे भंडारी समाज महिला मेळाव्यास उपस्थिती


रायगड वेध अभय पाटील

केंद्र शासनाच्या महिला सबलीकरण योजनेतून महिलांसाठी आवश्यक त्या योजना राबवून ग्रामीण भागामध्ये देखील महिलांनी स्वयंसिद्ध व्हावे आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले, श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथे भंडारी समाज महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या. 
  श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथील अखंड भंडारी समाज महिला मंडळाने आयोजित केलेल्या महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत वेळास भंडारी समाज महिलाध्यक्षा सेजल संदेश पेडणेकर, उपाध्यक्षा निहा पाटील, सचिव वृषाली मुरकर, खजिनदार प्रीती नाईक, भंडारी समाज अध्यक्ष रणजित मुरकर, सरपंच आशुतोष पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिलकर, माणगाव महिला तालुका अध्यक्षा सतवे, रायगड जिल्हा उपाध्यक्षा कुंटे तसेच इतर महिला उपस्थित होत्या. यावेळी वेळास भंडारी समाज महिला मंडळाच्या वतीने चित्रा वाघ यांना महिला भवन होण्यासाठी निवेदन देण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, श्रीवर्धन तालुका हा पर्यटन दृष्टीने विकसित होत असलेला तालुका आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी केंद्राच्या महिला सबलीकरण योजना राबवून प्रत्येक महिला विविध क्षेत्रामध्ये आपली कीर्ती उंचावेल व पर्यायाने आपल्या गावाचे, देशाचे नाव उंचावेल यासाठी प्रयत्नशील राहावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी त्यांनी आश्वस्त केले. 

1) भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कडे वेळास येथे महिला भवनासाठी निधी उपलब्ध होणेबाबत निवेदन देताना वेळास महिला मंडळ

2) भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे स्वागत करताना वेळास भंडारी समाज महिला मंडळ अध्यक्षा सेजल पेडणेकर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test