Type Here to Get Search Results !

भारतावर दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येणार का भारतीय ?

भारतावर दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येणार का भारतीय ?

टिम रायगड वेध

कोरोना लॉकडाऊनदरम्यान ओल्या पार्टीमुळे जॉन्सन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. संसदेत क्षमायाचनेनंतरही कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या (हुजूर पक्ष) दहापैकी ६ सदस्यांनी जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जॉन्सन यांची लोकप्रियता ३६ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या पोल सर्व्हेत ४६ टक्के लोकांनी ऋषी सुनाक यांना पंतप्रधान म्हणून पहिली पसंती दिली आहे. बँकर म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या ऋषी यांनी 2015 मध्ये पहिली निवडणूक लढविली. उत्तर यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

 जॉन्सन मंत्रिमंडळात सध्या गृह खाते सांभाळणार्‍या प्रीती पटेल यांना पंतप्रधान पदासाठी दुसर्‍या क्रमांकाची (१० टक्के) पसंती आहे, हे ही आणखी विशेष! गृहमंत्री प्रीती पटेल याही पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात. विथम मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. गुजराती मूळ असलेल्या सुशील पटेल आणि अंजना यांच्या त्या कन्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test