Type Here to Get Search Results !

• वेसावची पारू फेम लोकशाहीर आणि पारंपारिक कोळीगीतांचे बादशहा काशिराम चिंचय यांचे निधन

• वेसावची पारू फेम लोकशाहीर आणि पारंपारिक कोळीगीतांचे बादशहा काशिराम चिंचय यांचे निधन

टिम रायगड वेध

पारू गो पारू' वेसावची पारू', 'डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला', 'डोल डोलतंय वाऱ्यावर', 'मी हाय कोली' अशी पारंपरिक कोळीगीते सातासमुद्रापार पोहोचवणारे लोकशाहीर आणि पारंपारिक कोळीगीतांचे बादशहा काशिराम चिंचय यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे.

 गेल्या पाच दशकांत जात, धर्म, प्रांत या बाहेर जाऊन काशिराम यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना थिरकायला लावले. 'वेसावकर आणि मंडळी' या कलापथकाद्वारे निर्मित केलेल्या 'वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल' या अमिताभ बच्चन आणि काशीराम यांच्या आवाजातील संवाद आजही कोळ्यांची संस्कृती ताजी करतो. 'वेसावची पारू' या कोळी गीतांच्या पारंपारिक गीतांना 'प्लॅटिनम डिस्क'ने सन्मानित केले होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वेसावे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test