Type Here to Get Search Results !

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या प्रशासकपदी वीणा विनोद पाटील


• भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या प्रशासकपदी  वीणा विनोद पाटील 



रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी


भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ही संस्था नवोदित कवी, कवयित्रींना त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करणारी आहे. या संस्थेने नवनवीन उपक्रम आयोजित करुन नवोदितांना संधी दिली आहे. नुकतीच या संस्थेच्या रायगड जिल्हा प्रशासक पदी  वीणा विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात येत आहे असे संस्थेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी पत्राद्वारे कळवले आहे. 

   श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथिल रहिवासी असलेल्या विना पाटील या उत्तम लेखिका आणि कवयित्री असून त्यांचे लेख तसेच कविता वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले, अनेक वॉट्सप समुहात उत्तम योगदान आहे. रेडीओ एफ एम वर रचना प्रसारित झालेल्या आहेत. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यांची साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून त्यांना हे पद देण्यात आले आहे. या नियुक्ती बदल संस्थेच्या कार्याध्यक्षा आम्रपाली घाडगे, संस्थापक विशाल शिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, शिल्पा मुसळे, रिया पवार, सिध्दार्थ आंबेकर, ऋतुजा मिसळे,ओंकार मेहेर,सार्थक जाधव, नम्रता भंदुरे, सरिता कलढोणे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ.पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test