Type Here to Get Search Results !

• तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता.१७ पैकी १० जागेंवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी.• सेनेला भासली बाळशेठ लोखंडेची कमतरता.


• तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता.
१७ पैकी १० जागेंवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी.

• सेनेला भासली बाळशेठ लोखंडेची कमतरता.


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा नगरपंचायतीत २५ वर्षानंतर सत्तांतर झाले असून तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली आहे. नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १० जागेवर राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून आले आहेत.४ जागांवर शिवसेना तर तीन जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत.गेली २५ वर्षे तळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती.शिवसेनेचे दिवंगत नेते बाळशेठ लोखंडे यांनी कायम राष्ट्रवादी ला नगरपंचायतीच्या सत्तेपासून दूर ठेवले होते. परंतु कोरोनामुळे बाळशेठ लोखंडे यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीला सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार निवडणुकीच्या सुरुवातीपासून खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनी तळा शहरावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक प्रभाग पिंजून काढला होता. अगदी मतदानाच्या दिवशी देखील आ.अनिकेत तटकरे प्रत्येक प्रभागात जातीने लक्ष देताना पहायला मिळाले.बुधवारी सकाळी १० च्या दरम्यान तळा तहसिल कार्यालयात मतमोजणी ला सुरुवात झाली. पहिल्या ९ प्रभागांच्या निकालामध्ये ४ राष्ट्रवादी ४ शिवसेना व १ भाजपाचा उमेदवार निवडून आले. तर दुसऱ्या १० ते १७ प्रभागांच्या निकालामध्ये राष्ट्रवादी ६ शिवसेना ० तर भाजपाचे २ उमेदवार विजयी झाले.जसजसे निवडणुकीचे निकाल हाती येत होते तसतसे राष्ट्रवादीच्या गटात जल्लोष होत होता तर शिवसेनेच्या गटात शांतता पसरल्याचे चित्र पहायला मिळाले.एकंदरीत शिवसेनेला भासलेली बालशेठ लोखंडेची कमतरता व तटकरे कुटुंबीयांनी घेतलेली मेहनत यामुळे तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली आहे.

*प्रभागनिहाय विजयी उमेदवार व पक्ष पुढील प्रमाणे.
प्रभाग क्र.१ ग्रीष्मा गणेश बामणे(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(२) नरेश बाळू सुर्वे (शिवसेना)
प्रभाग क्र.(३)यामिनी जनार्दन मेहत्तर(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(४)सिराज महमद शरीफ खाचे(अपक्ष शिवसेना पुरस्कृत)
प्रभाग क्र.(५)दिव्या निलेश रातवडकर (भाजप)
प्रभाग क्र.(६)नेहा नमित पांढरकामे(शिवसेना)
प्रभाग क्र.(७)मंगेश गणपत पोळेकर(शिवसेना पुरस्कृत अपक्ष बिनविरोध)
प्रभाग क्र (८)सारिका महेश गवळी(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(९) पुष्पा हरिश्चंद्र नागे(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(१०)मंगेश रामचंद्र शिगवण (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(११) चंद्रकांत महादेव रोडे (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(१२) अविनाश रवींद्र पिसाळ(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(१३)अर्चना विजय तांबे (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(१४)रितेश रविंद्र मुंढे (भाजप पुरस्कृत अपक्ष)
प्रभाग क्र.(१५) अस्मिता चंद्रकांत भोरावकर(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र.(१६) सुरेखा नामदेव पवार(भाजप)
प्रभाग क्र.(१७)माधुरी शैलेश घोलप(राष्ट्रवादी)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test