Type Here to Get Search Results !

• नेवरुळ गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा● ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, न्यु इंग्लिश स्कूल यांचा संयुक्त कार्यक्रम


• नेवरुळ गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

● ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, न्यु इंग्लिश स्कूल यांचा संयुक्त कार्यक्रम


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


नेवरुळ गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, न्यु इंग्लिश स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चँम्पियन कराटे क्लब, म्हसळा प्रशिक्षक अविनाश मोरे व अभय कलमकर यांच्या मार्गदर्शनात कराटे क्लबचे विद्यार्थी यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कला सादर केली. यामध्ये लाठीकाठी फिरवणे, भाला चालविणे, हाताने कौले फोडणे, दांडपट्टा चालविणे, अशा विविध प्रकारचे स्वरक्षणार्थ प्रात्यक्षिक सादर करून कौशल्य दाखविले. तसेच इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथम, द्वितीय, त्रीतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या गुणगौरवाचे श्रेय सर्वस्वी नेवरुळ गावचे उपसरपंच सुनील दिवेकर यांना जाते. तसेच ज्या विद्यार्थी यांनी कराटे चे प्रात्यक्षिक सादर केले होते त्या सर्व विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रवींद्र लाड यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला व्हि.बी.गंद्रे गँस एजन्सी दिवेआगर मालक समीर गंद्रे प्रमुख उपस्थित होते.
समीर गंद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मला आजच्या कार्यक्रमाला बोलावून व माझ्या हस्ते ध्वजारोहण करून मला सन्मानित केलेत त्याबद्दल समस्त नेवरुळ गावाचे मी आभारी आहे. त्याचप्रमाणे रवींद्र लाड यांनी जे काही प्रयत्न करुन शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला व शाळेला नवसंजीवनी दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या कार्यक्रमाला श्रीवर्धन आगाराचे डेपो व्यवस्थापक तेजस गायकवाड व सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक प्रदिप विचारे उपस्थित होते. घुम, रुद्रवट, कोकबल, ठाकरोली, सांगवड या गावातील एस टी बससेवा सुरू करून मिळावी अशी मागणी करण्यात आली कारण जे विद्यार्थी आहेत ते सर्व याच गावातुन शाळेत येत आहेत. एसटी बस संप सुरू असल्याने या सर्व विद्यार्थी यांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावरुन पायपीट करावी लागते. व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून समस्त ग्रामस्थ यांच्या कडून गायकवाड व विचारे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली या चर्चे नंतर विचारे व गायकवाड यांनी आश्वासन दिले की येत्या ३ फेब्रुवारी पर्यंत बससेवा सुरू करु असे अश्वासन दिले.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करतना सांगितले की पंचक्रोशीतील जे विद्यार्थी पायपीट करून शाळेत येत आहेत त्यांचे हाल मला बघवत नाही व त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होउ नये म्हणून आपण लवकरात लवकर बससेवा सुरू करावी अशी विनंती केली. तसेच कराटे सादर केलेल्या विद्यार्थी यांचे कौतुक करून याचे श्रेय अविनाश मोरे व अभय कलमकर यांना जाते तसेच समीर गंद्रे यांनी माझ्या विनंतीला मान देउन आमच्या शाळेला जी काही रक्कम देणगी स्वरूपात मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व असेच आमच्या पाठिशी उभे रहा असेही सांगितले. तसेच अनेक मान्यवरानी मनोगत व्यक्त करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाधव सर व प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका निरणे मँडम यांनी केले तर हिरवे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
यावेळी कार्यक्रमाला एच.पी. गँसचे मालक समीर गंद्रे, माजी सभापती रवींद्र लाड, श्रीवर्धन आगार डेपो व्यवस्थापक तेजस गायकवाड,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक प्रदिप विचारे,नेवरुळ सरपंच जयश्री लाड, उपसरपंच सुनील दिवेकर, पोलीस पाटील निलेश लटके, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लाड, सुशांत लाड, घुम-रुद्रवट सरपंच केतन आग्रे, नामदेव महाडिक, दत्ता लटके, कोकबल ग्राम अध्यक्ष पांडुरंग मांडवकर, महादेव काप, शंकर सावंत, मोहन कापडी, विनायक खेरटकर, सहदेव जाधव, यतीन करडे, सुहास गोविलकर, अभय कलमकर, अविनाश मोरे, विश्वास खांडेकर, मनोहर तांबे, पुजा गंद्रे, सदलगेसर, जाधवसर, संदीप कार्लेकर, हिरवेसर, मुख्याधिपिका निरणे मँडम, महिला मंडळ व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test