Type Here to Get Search Results !

• गोमांस विक्रीस नेणा-या टोळीला जेरबंद करणाऱ्या नागोठणे पोलिसांचा सन्मान


• गोमांस विक्रीस नेणा-या टोळीला जेरबंद करणाऱ्या नागोठणे पोलिसांचा सन्मान 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 गोवंश जातीच्या प्राण्यांची बेकायदेशीरपणे कत्तल करून ते मांस अवैधरीत्या मुंबई येथे विक्रीसाठी नेणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नागोठणे पोलिसांनी दि.१६ रोजी जेरबंद केले होते. नागोठणे पोलिसांच्या या धडेकेबाज कामगिरीचे सर्वत्रच स्तरांतून कौतुक होत असताना नागोठणे येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नागोठणे पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाचे त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरी बद्दल त्यांचे दि. १७ रोजी सायंकाळी पोलिस ठाण्यात अभिनंदनाचे पत्र देत विशेष सन्मान करण्यात आला. नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांच्यासह या धडाकेबाज कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, हे.कॉ. नितीन गायकवाड, हे.कॉ. ब्रिजेश भायदे, पो.ना. मिथुन मातेरे, पो.ना. सत्यवान पिंगळे व पो.कॉ.रामनाथ ठाकूर यांचेही विशेष कौतुक हिंदू जनजागृती समितीकडून यावेळी करण्यात आले. यावेळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली ते पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांनी हिंदू जनजागृती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. तसेच कुलस्वामिनीच्या कृपेने १९८७ नंतर पुन्हा एकदा नागोठणे वासियांची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली या संधीचा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोनं करून पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सहकार्य करत योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन असेही चव्हाण यांनी उपस्थितांना सांगितले. 

दरम्यान यावेळी गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून गोमांस विकण्यासाठी नेणार्या या अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसेच मा. न्यायालयाकडून या आरोपींनी केलेल्या घृणास्पद कृत्या बद्दल जामीन नाकारण्यात यावा यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नागोठणे पोलिसांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष योगेश ठाकुर, किशोर म्हात्रे,बापू महाराज रावकर, सुनिल लाड, चेनत कामथे, जितेंद्र जाधव,  कुथे,अॅड. श्रीकांत रावकर, निलेश भोपी, राजेश शेडगेे, रोहिदास हातनोलकर, संतोष जोशी, सचिन ठोंबरे, नितीन राऊत प्रज्योत कडव,प्रभु तांडेल, अल्विन नाकते, नरेश भंडारी यांच्या सह हिंदू जनजागृती समितीचे सदस्य उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test