Type Here to Get Search Results !

म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचा गजर ● राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एकहाती सत्ता● काँग्रेस - शिवसेना युतीने दिली राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी टक्कर● काँग्रेस आय चे सचिव रविंद्र दळवी यांचा एका मताने पराभव


म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचा गजर


 ● राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एकहाती सत्ता

● काँग्रेस - शिवसेना युतीने दिली राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी टक्कर

● काँग्रेस आय चे सचिव रविंद्र दळवी यांचा एका मताने पराभव

● 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी, काँग्रेस 2 आणि शिवसेना 2 आणि काँग्रेस आय जागांवर विजयी.


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 -22 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आय - शिवसेना युतीच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा म्हसळा नगर पंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करून गड कायम राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेस आणि शिवसेना युतीने राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी टक्कर देवुन दोन, दोन अशा चार जागा निवडुन आणल्या आहेत. 
दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या 12 प्रभागातील आणि दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या 4 प्रभागातील निवडणूक मिळुन 16 जागांसाठी निवडणुक प्रकिया पार पडली होती तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज मंगेश म्हशीलकर या बिनविरोध निवडुन आल्या होत्या.16 प्रभागात पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 12 तर सेना काँगेसचे प्रत्येकी 2 असे 4 उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
निकालाचे दिवशी निवडनुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे, सहा.निवडणूक अधिकारी मनोज उकिर्डे यांनी निवडणूक प्रकिया सकाळी 10 वाजता वेळेत सुरू करून अवघ्या दीड तासात सर्व निकाल जाहीर केले.या कामी म्हसळा पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
    प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये काँग्रेसने आपल्या जागा राखण्यात यश प्राप्त केला आहे. येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख यांनी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते शाहिद उकये यांचे चिरंजीव अब्दुल उकये यांचा मोठया फरकाने पराभव केला आहे. हा पराभव राष्ट्रवादीचे जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसच्या सुफीयान हलदे याने राष्ट्रवादीचे मुबिन हुर्जुक यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला आहे तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादीचे शाहिद जंजिरकर यांनी काँग्रेसचे तालुका सचिव रविंद्र दळवी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे. या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी निवडणूक निकाल जाहीर होताच म्हसळा येथे येऊन सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून मतदारांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच आता भविष्यात म्हसळा शहराचे सर्वांगीण विकासाला अधिकाधिक चालना देण्यात येईल असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलिशेठ कौचाली यांनी म्हसळा शहरातील जनतेने खासदार सुनिल तटकरे यांचे विकासरुपी कामांना मते दिली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


◆ म्हसळा नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग निहाय झालेले मतदान

*म्हसळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - 2021 निकाल*

प्रभाग क्रमांक - 1
कमळ रविंद्र जाधव - 55 ( राष्ट्रवादी)विजयी
काँग्रेस आय - कमळी पवार 37 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 2
संजय यशवंत दिवेकर - 221 राष्ट्रवादी - विजयी
शिवसेना - प्रविण विनोद बनकर - 87 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 3
राष्ट्रवादी - मेहजबिन नदीम दळवी - 231 ( विजयी)
शिवसेना - मिनाज शहजाद कादिरी - 60 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 4
राष्ट्रवादी - सरोज मंगेश म्हशीलकर 
बिनविरोध विजयी

प्रभाग क्रमांक - 5
राष्ट्रवादी - नौसीन सलीम चोगले - 197 - विजयी
काँग्रेस आय - यास्मिन इम्रान मुंगये - 97 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 6
राष्ट्रवादी - असहल असलम कादिरी -225 - विजयी
काँग्रेस आय - जहुर हुर्झुक - 160 - पराभूत
भाजप - 03 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 7
राष्ट्रवादी - बशारत फरहीन अ.अझीज - 115 -विजयी
काँग्रेस आय - पेणकर हीबा अब्दुल नईम - 68 - पराभूत
इतर - 03 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 8 
राष्ट्रवादी - सुमैय्या कासम आमदानी - 164 - विजयी
काँग्रेस आय - खतीब गुहेर मतीब - 100 - पराभूत
इतर - 01

प्रभाग क्रमांक - 9
राष्ट्रवादी - उकये अब्दुल रहीम शाहिद - 89 - पराभूत
काँग्रेस आय - डॉ.मुविझ शेख - 197 - विजयी
इतर -01

प्रभाग क्रमांक - 10
राष्ट्रवादी - मुबिन दाऊद हुर्झुक - 103 - पराभूत
काँग्रेस आय - सुफियान इकबाल हलदे - 106 - विजयी
इतर - 02

प्रभाग क्रमांक - 11
राष्ट्रवादी - म्हसलाई सारा अब्दुल कादिर - 160 - विजयी
काँग्रेस आय - करदेकर नाझीमा महमद - 108 - पराभूत
शेकाप - घरटकर अफरीन - 49 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 12
राष्ट्रवादी - शाहिद सईद जंजिरकर - 127- विजयी
काँग्रेस आय - रविंद्र नामदेव दळवी - 126 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 13
राष्ट्रवादी - कविता शितल बोरकर - 109 - पराभूत
शिवसेना - राखी अजय करंबे - 144 - विजयी

प्रभाग क्रमांक - 14 
राष्ट्रवादी - संदिप रमेश बरटक्के - 01 - पराभूत
शिवसेना - अनिकेत दिलीप पानसरे - 57 - विजयी
भाजप - सचिन करडे - 43 - पराभूत
अपक्ष - निकेश ओमप्रकाश कोकचा - 34 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 15
राष्ट्रवादी - जयश्री चंद्रकांत कापरे - 74 - विजयी
शिवसेना -निता प्रसाद बोर्ले - 61 - पराभूत
भाजप - सरिता संतोष पानसरे - 49 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 16
राष्ट्रवादी - संजय प्रभाकर कर्णिक - 327 - विजयी
शिवसेना - राजकीरण दत्ताराम खताते - 114 - पराभूत
भाजप - प्रसाद अशोक पोतदार - 19 - पराभूत

प्रभाग क्रमांक - 17
राष्ट्रवादी - सुनिल गणपत शेडगे - 280 - विजयी
भाजप - शरद हिरामण चव्हाण - 61 - पराभूत
शिवसेना - मिथुन चांदोरकर - 46 - पराभूत

◆ *राष्ट्रवादी काँग्रेस - 13 जागा, शिवसेना - 2 जागा, काँग्रेस आय - 2*

अशा प्रकारे मतदान झाले आहे.

म्हसळा नगरपंचायत निवडणूक विजयानंतर जल्लोष कारताना पदाधिकारी व कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test