Type Here to Get Search Results !

• “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्ताने साहित्य संपदा आयोजित रमेश धनावडे यांचा "कथाकथन" कार्यक्रम संपन्न


• “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्ताने साहित्य संपदा आयोजित रमेश धनावडे यांचा "कथाकथन" कार्यक्रम संपन्न

   
 रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
 

 राज्य शासनाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्याचे नियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर दि.१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग-रायगड येथे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्ताने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, साहित्य संपदा आयोजित रमेश धनावडे यांच्या "कथाकथन" हा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला.
      मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आयोजित या कथाकथन कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमेश धनावडे यांनी साप्ताहिक कोकणनामा 2021 च्या दिवाळी अंकात   प्रकाशित झालेली "सुगी" ही आपली कथा अतिशय सुंदररित्या उपस्थितांसमोर सादर केली. तसेच यावेळी "साहित्य संपदा" चे वैभव धनावडे, डॉ.सुवर्णा पाटील, विजय पराडकर, प्रांजली मोहिते, साहित्य संपदा या संस्थेतील काही मुलांनी व इतर स्पर्धकांनी विविध विषयांवरील कथा मराठी भाषा संवर्धन निमित्त आयोजित कथाकथन कार्यक्रमात सादर केल्या.
    ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील व तहसिलदार विशाल दौंडकर यांनी उत्तम समन्वय साधला तर तांत्रिक साहाय्य शार्दूल भोईर यांनी केले.
    या कार्यक्रमाच्या शेवटी रमेश धनावडे यांनी आभार प्रदर्शन करतेवेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा प्रशासन आणि हा कथाकथन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानून या कार्यक्रमाची गोड सांगता केली.
   ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन "साहित्य संपदा" चे वैभव धनावडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test