Type Here to Get Search Results !

आमच्या नेत्याबद्दल व भगिनी बद्दल जर कोणी बेताल वाक्य वापरले तर जशास तसे उत्तर दिले जाईल- आमदार अनिकेत तटकरे


आमच्या नेत्याबद्दल व भगिनी बद्दल जर कोणी बेताल वाक्य वापरले तर जशास तसे उत्तर दिले जाईल
- आमदार अनिकेत तटकरे 


रायगड वेध रमेश घरत शिस्ते

 खा. सुनील तटकरे व पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झालेल्या मुख्यमंत्री  ग्रामसडक योजने अंतर्गत रानवली वडघर रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच सेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. याबाबत उद्देशून म्हणताना दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणण्याचं पाप सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचं वक्तव्य आ. अनिकेत तटकरे यांनी रानवली येथील सभेत केले. या वेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उप तालुका अध्यक्ष अमित खोत, युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे, दिवेआगर सरपंच उदय बापट, संदेश काते, व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

   मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रानवली वडघर रस्ता भूमिपूजन, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा रानवली, साखरी, बागमंडला येथील विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

      मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे म्हणून त्यांच्या नावाने असलेल्या योजनेचा भूमिपूजन आम्ही करणार अशी मानसिकता असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मुख्यमंत्री तुम्हाला तुमचे वाटतात तितकेच आमचे देखील आहेत. निधीसाठी कोणाची शिफारस लागते याचा अभ्यास करावा म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आपण निधी आणला असेल तर काल केलेल्या भूमिपूजनावेळी अधिकारी वर्ग का नव्हता आपण कामाची पाटी का लावली नाही. फक्त बॅनरबाजी करण्यापेक्षा निधीसाठी आपण काय प्रयत्न केला त्याबद्दल एखादं चिटोर तरी दाखवावं असे खुले आवाहन आ. अनिकेत तटकरे यांनी सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यावेळी बोलताना दिले.

 तटकरे कुटुंबीयांनी फक्त कुटुंबाचाच विकास केला. आदिती व अनिकेत वडिलांच्या पुण्याईने निवडून आले असे वक्तव्य करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की तुम्ही स्वतः  जिल्हा परिषद सदस्य देखील आमच्या वडिलांच्या पुण्याईने झालात. असे म्हणत नाव न घेता माजी जिल्हा परिषद सदस्य शाम भोकरे यांना टोला लगावला. आता येत्या जिल्हापरिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडून उभे राहा डिपॉजीट नाही जप्त करायला लावलं तर नाव नाही सांगणार असे वक्तव्य आ. अनिकेत तटकरे यांनी केले.

खासदार सुनील तटकरे  व पालकमंत्री यांच्याविरोधात टीका करून आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यानी उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार थांबवावा. यापुढे आमच्या नेत्याबद्दल व आमच्या भगिनी बद्दल बेताल वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी विरोधकांना दिला. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवगणे यांच्यावर टीका करताना काल आलेले नवगणे यांच्यात कोणतेही गुण दिसत नाही. निजामपूरमध्ये का मारलं याच त्यांनी उत्तर द्याव अस देखील आ. तटकरे म्हणाले.

यावेळी बागमंडला हनुमान वाडीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 खा. सुनील तटकरे  यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याबाबत आ. अनिकेत तटकरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test