Type Here to Get Search Results !

• विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने यश मिळवा:- सत्यवान रेडकर• बोर्ली पंचतन येथे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न


• विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने यश मिळवा:- सत्यवान रेडकर


• बोर्ली पंचतन येथे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न


रायगड वेध अभय पाटील

विद्यार्थांनी आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी जिद्द उराशी ठेवून ज्ञानाचा खजिना प्राप्त करा आणि आपले ध्येय साध्य करा असे विचार मुंबई सीमा शुल्क येथे अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे सत्यवान रेडकर यांनी मांडले . बोर्ली पंचतन येथे विद्यार्थांसाठी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते.
  ग्रामीण भागातील विद्यार्थाना शासकीय स्पर्धा परिक्षेबाबतचे शिक्षण किंवा माहिती मिळविण्यासाठी शहर गाठावे लागते यामध्ये सह्याद्री मैत्री फाउंडेशन च्या माध्यमातून तिमिरातून तेजाकडे या शासकीय स्पर्धा परिक्षेबाबतचे मार्गदर्शन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सरपंच ज्योती परकर, जनता शिक्षण संस्था विश्वस्त अध्यक्ष रविंद्र कुळकर्णी, संचालक मंडळ उपकार्याध्यक्ष नंदकुमार पाटील, सदस्य आनंत धनावडे, प्राचार्य जालिंदर पोटे, सह्याद्री मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, सल्लागार विवेक मयेकर, माजी उपसरपंच प्रकाश तोंडलेकर, शिक्षक वृंद व विद्याथी वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थाना प्रमुख मार्गदर्शक व सध्या मुंबई सीमा शुल्क येथे अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे सत्यवान रेडकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
आपल्या जीवनाची सुरुवात कशी झाली आणि आपल्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन अधिकारी पदापर्यंतचा प्रवास याबद्दल माहिती दिली, परिवर्तनशील आणि दूरदृष्टी असणारे विचार आत्मसात करून त्याचा त्याचा अवलंब करा उत्तुंग शिखरे गाठा शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना प्राप्त करा असे सांगताना, अपयशाने खचून न जाता ग्रामीण भागातून विद्यार्थ्यानी स्पर्धा परिक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जावे यश तुमचेच आहे असे सांगितले. सह्याद्री मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत आयोजकांना धन्यवाद देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test