Type Here to Get Search Results !

• वांगणी ग्रमापंचायतीच्या पोटनिवडणूकीत आघाडीचे एकनाथ ठाकूर विजयी


• वांगणी ग्रमापंचायतीच्या पोटनिवडणूकीत आघाडीचे एकनाथ ठाकूर विजयी 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा

  नागोठण्याजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त झालेल्या एक जागेसाठी दि. १८ रोजी घेण्यात आलेल्या वांगणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी दि. १९ रोजी लागला. एकूण ७११ पैकी ६१४ मतदान झालेल्या या पोटनिवडणुकीत शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर हे ५० मतांनी विजयी झाले.या पोटनिवडणुकीत शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे विजयी उमेदवार एकनाथ ठाकूर यांना ३३२ मते मिळाली तर मनसेचे हिराचंद्र दळवी यांना २८२ मते मिळाली. 
वांगणीतील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेसाठी निवडून आलेले सदस्य हिराचंद तेलंगे यांचे सदस्यत्व जातपडताळणी समितीकडून रद्द झाल्याने ही पोटनिवडणुक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत विजयी झालेले उमेदवार एकनाथ ठाकूर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके यांच्यासह नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टकेे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे,रमेश भिसे,एकनाथ जांंबेकर, यशवंत हळदे,प्रमोद जांबेकर, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य राजेश पिंपळे,शेखर ठाकूर,किशोर कदम यांनी अभिनंदन केले यावेळी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test