Type Here to Get Search Results !

• राजकारण बाजूला ठेवून गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय - किशोरभाई जैन• नागोठण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न


• राजकारण बाजूला ठेवून गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय - किशोरभाई जैन

• नागोठण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न 


 रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 नागोठणे रोल मॉडेल करत असतानाच ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागात अनेक विकासकामे मार्गी लावण्याचे काम सध्या जोमाने सुरु आहे. तसेच विकासकामे करताना या विभागात आमचे कार्यकर्ते नाहीत म्हणून त्या विभागात विकासकामे करू नयेत अशा विचारसरणीचे आम्ही नसून राजकारण विरहित विकासकामे केली पाहिजेत अशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना शिकवण दिली असून राजकारण बाजूला ठेवून गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे महत्त्वाचे ध्येय असून नागोठणे गावातील विविध विभागात विविध विकासकामे केलेली आहेत तसेच यापुढेही करत राहणार असल्याचे उद्गार नागोठणे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांनी काढले.
नागोठणे गावातील शुद्ध पाणीपुरवठा योजना गेले अनेक वर्ष काही कारणांमुळे प्रलंबित असल्यामुळे नागोठणेकर जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. गावात इतर कामांसाठी पाणी मुबलक असले तरी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही.अशुद्ध पाण्यामुळे रोगराई वाढत असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे त्यामुळे यावर उपाय म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सवी वर्षात २६ जानेवारी रोजी ७३व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडेल अशी फिल्टर वॉटर एटीएम मशीनची व्यवस्था केली असून या वॉटर एटीएमचेे उद्घाटन व लोकार्पण नागोठणे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वॉटर एटीएमच्या माध्यमातून ग्रामस्थांना १ रुपयात १ लिटर व १० रुपयात २० लिटर पाणी मिळणार आहे. तसेच ज्या ग्रामस्थांनी मार्च अखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेली अशा ग्रामस्थांना शुद्ध पाणी मोफत दिले जाणार असल्याची माहिती यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी उपस्थितांना दिली. दरम्यान कोविड महामारीच्या काळात देखील नागोठणे ग्रामपंचायतीने विकासकामांना खंड पडू दिला नाही तसेच सरपंच हे स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांची विशेष काळजी घेतल्यामुळे गावातील नागरिक सुरक्षित राहिले तसेच किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने एकमताने एक दिलाने विकासकामे केली त्यामुळे ग्रामस्थांनी किशोरभाई जैन यांच्यासह सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, माजी उपसरपंच सुुुुरेश जैैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचे उपस्थित नागोठणेकर ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
             नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालय येथील फिल्टर वाटर एटीएम मशीनचे उद्घाटन किशोरभाई जैन यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांना जिल्हा परिषद सेस, पंचायत समिती सेस तसेच ग्रामपंचायत १५वा वित्त आयोगाच्या फंडातून करण्यात आलेल्या गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या काही विकासकांचे भूमिपूजन या बाबत नागोठणे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांनी यावेळी माहिती दिली. याचबरोबर विकासकामांच्या बाबतीत नागोठणेकरांना दिलेला शब्द पुर्ण केला याबद्दल अतिशय आनंद होत आहे. तसेच ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेची सेवा करणारे खडकआळी ग्रामस्थांना येथील सामाजिक सभागृहासाठी माझ्या माध्यमातून १५ लाख इतका निधी उपलब्ध झाल्याने मला समाधान वाटत असल्याचेही यावेळी किशोरभाई जैन यांनी सांगितले.
     यावेळी नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,उपसरपंच मोहन नागोठणेकर, रोहा पं.स. सदस्य बिलाल कुरेशी, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश जैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, मधुकर महाडिक, प्रकाश कांबळे, इम्रान पानसरे, सिराज पानसरे, सुरेश कामथे, सुनिल लाड, सगीर अधिकारी, शब्बीर अधिकारी, अशपाक पानसरे, उदंड रावकर, दीपक गायकवाड, पांडुरंग कामथे, मंगेश कामथे, असिफ मुल्ला, राजू टेमकर, बाळू राटटे, संतोष वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
-------------------------------------

 *नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन* 

नागोठणे ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सवी वर्षात ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सेस, पंचायत समिती सेस तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या फंडातून नागोठणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर वॉटर एटीएम मशीन लोकार्पण, प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत उद्घाटन, स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे व नुतनीकरणाचे उद्घाटन, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे सानिध्यात वसलेल्या खडकआळी येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे पूजन करून रमाईनगर येथील सामाजिक सभागृह येथे करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण, गवळआळी येथे गटार बांधणे भूमिपूजन, गवळआळी-रमाईनगर-मराठाआळी येथील नवीन पाणी पुरवठा लाईनचे लोकार्पण, हायवे ते उर्दू हायस्कूल, तक्का ते बिलाल कुरेशी यांचे घर येथील नवीन पाईप लाईन लोकार्पण आदी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या हस्ते संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test