Type Here to Get Search Results !

म्हसळा तालुक्यात कोरोनाची तीसरी लाट ...आज शनिवारी १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह● नव्याने एकूण २६ रुग्ण बाधित तर आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १०६३


• म्हसळा तालुक्यात कोरोनाची तीसरी लाट ?.. शनिवारी १५ जानेवारी २०२२ रोजी १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

● नव्याने एकूण २६ रुग्ण बाधित तर आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १०६३


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. 
म्हसळा तालुक्यातही मागील दिवसांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे. तालुक्यात आज शनिवारी 14 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यानी प्रसीध्दी पत्रकांत दिली आहे. तालुक्यात आजपर्यंत उपचार सुरु असलेल्या बाधीतांची संख्या 26 असून आजपर्यंत कोरोना बाधीतांची एकूण संख्या 1063 झाली आहे. कोरोनामुळे एकूण मृत 54, तर एकूण बरे होऊन डिस्चार्ज झालेले रुग्ण 983 आहेत. बाधीत रुग्णांत बहुतांश रुग्ण 30 ते 55 वयोगटांतील आहेत. बहुतांश रुग्ण गृह विलगी करणात (Home Isolatation) आहेत.

शनिवारी सकलप 1, म्हसळा शहर 9, मेंदडी 1, तोंडसुरे 1, घोणसे 1, पांगलोली 1, असे नव्याने एकूण 14 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.

■ उपचार घेणारे रुग्ण पुढील गावांतील आहेत. 

पाभरे - 1
सकलप - 1
रोहिणी - 2
तुरुंबाडी - 1
म्हसळा शहर - 16
खरसई - 1
तोंडसुरे - 1
घोणसे - 1
पांगलोली - 1
मेंदडी - 1
एकूण संख्या - 26 आहे.

म्हसळाकरानो सावधान…! कोरोना वाढतोय…मात्र काळजी करू नका..काळजी घ्या..!

● तालुक्यांत जास्तीत जास्त नागरिकांच्या कोविड तपासण्या कराव्यात, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर तातडीने दंडात्मक निपक्षपाती कारवाई करावी.●

म्हसळा शहरात अनेक नागरिक विना मास्क फिरत असतात, नगरपंचायत किंवा पोलीस प्रशासन यांनी विना मास्क फिरणारे तसेच बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी पुढे येत आहे.

■ "आज शनिवारी एकूण 14 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून म्हसळा तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे तसेच आरोग्य विभागाचे सूचनांचे पालन करावे."
डॉ.प्रशांत गायकवाड
म्हसळा तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी

◆ "मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे, या सूचनांचे प्रत्येक नागरिकानी पालन करावे असे आवाहन म्हसळा तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री.समीर घारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test