Type Here to Get Search Results !

शिवसेना बोर्ली पंचतन विभागातील शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे• पक्ष श्रेष्ठी लक्ष देत नाहीत व कोणी निधी देत नसल्याची खंत • शिवसेना बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गट फुटीच्या उंबरठ्यावर यास सर्वस्वी जबाबदार पक्ष श्रेष्ठीच - उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर• महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर महाविकास बिघाडी- उपजिल्हा प्रमुख शाम भोकरे

• शिवसेना बोर्ली पंचतन विभागातील शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

• पक्ष श्रेष्ठी लक्ष देत नाहीत व कोणी निधी देत नसल्याची खंत 

• शिवसेना बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गट फुटीच्या उंबरठ्यावर यास सर्वस्वी जबाबदार पक्ष श्रेष्ठीच - उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर

• महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर महाविकास बिघाडी- उपजिल्हा प्रमुख शाम भोकरे


रायगड वेध अभय पाटील

श्रीवर्धन मतदार संघातील बोर्लीपंचतन या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये माझी व माझ्या पत्नीची ईच्छा नसतानाही शिवसेना पक्ष मतदारांच्या इच्छेखातर लढलो आणि यामध्ये माझी पत्नी सायली तोंडलेकर जिल्हा परिषद गटातून निवडून आली . आम्ही व आपण सर्व पक्ष निष्ठेने शिवसेना पक्षाचे काम करीत आहोत. मात्र वरिष्ठ नेते मुख्यमंत्री आपला असतानाही विकास कामांना कोणताही निधी न दिल्याने शिवसेना पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावरती निर्माण झाला असल्याची खंत श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती तथा उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी समस्त पदाधिका-यां समोर व्यक्त केली असतानाच सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याचे उपजिल्हाप्रमुख श्यामकांत भोकरे यांनी या सभेमध्ये सांगितले. 
   बोर्ली पंचतन जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बुधवार 19 जानेवारी रोजी बोर्ली पंचतन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यातआली होती यासभेमध्ये अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मसुद दर्जी, उपजिल्हा प्रमुख श्यामकांत भोकरे,
उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर, एजाज हवलदार, निखिल कांबळे, दिनेश नाक्ती,वप्रदिप मुरकर, जनार्दन गोवारी, उपविभाग प्रमुख अनिल पवार, दामोदर पाटील, याशिवाय श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या गटातील शेखाडी, भरडखोल, दिवेआगर, खुजारे, कार्ले, वांजळे, कोंडेपंचतन, बोर्लीपंचतन, कापोली, शिस्ते, भावे, वडवली, वेळास, आदगांव, सर्वे, नानवेली, मणेरी, दिघी, कुडगांव, हरवीत विभागातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविका मध्ये उपविभाग प्रमुख अनिल पवार म्हणाले की मी मुख्यमंत्री सोडून सर्वच वरीष्ठ नेतेमंडळी, मंत्र्यांना भेटलो आहे तरीही साधे सभामंडप वा वेळास, आदगांव, सर्वे नानवेली करीता रातराणी बस मागणी केली असता तेही होऊ शकली नाही. वडवली येथील शिवसैनिक निखिल कांबळे म्हणाले की तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित असतानाही आपण मागे आहोत याचे वाईट वाटते. जिल्हा परिषद उमेदवारासाठी २०१७ मध्ये जिंकण्यासाठी मेहनत घेतली परंतु विकासकामे काहीच नाही. श्रीवर्धन मतदार संघ कोणाला बहाल केला आहे की काय असाही प्रश्न उद्भवत आहे. उद्योगमंत्री सतत दुसरा टर्म असतानाही किती मुले कामाला लागली. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे पक्षप्रमुखच बसले आता विकासकामे पक्षाच्या माध्यमातून होतील अशी अपेक्षा होती मात्र तसे काही होत नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर पोटनिवडणुकीत श्रीवर्धन मध्ये शिवसेना उमेदवार निवडून आले. तुकाराम सुर्वे सारख्या सामान्य शेतकऱ्याला हा मतदारसंघ आमदार बनु शकतो त्या मतदारांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी वा-यावर सोडले आहे. तर वाघाची डरकाळी फोडणारा पक्षाची हालत फार बिकट झाली असल्याची घणाघाती टिका कुडगांवचे कट्टर शिवसैनिक एजाज हवलदार यांनी केले. ते पुढे म्हणाले की २०१७ पासून आमच्या कुडगाव गावात पक्षाच्या माध्यमातून एकही विकासकाम झाले नाही. शिवसेनेच्या अशा वागण्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस फोफावला आहे. आमच्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळे आमदार निवडून आला नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचे असतानाही दिघी पोर्ट मध्ये उद्योगमंत्री यांच्या अधिपत्याखाली पण कामांचा ताव भलताच माणूस करतोय. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आपलेच तीन आमदार पळवतात तर निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मतदारांना तोंड कसे दाखवणार याचा पाढाच वाचला. आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना श्रीवर्धन पंचायत समीतीचे माजी सभापती, उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर म्हणाले की २००७ मध मी उपसभापती, सभापती झालो तेव्हाचा सभापती आणि आजचे सभापती पद भूषविणारे यामध्ये खूप फरक आहे. ईच्छा नसतानाही मतदारांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद निवडणूकिसाठी पत्नीला उभी केली व लढलो आणि जिंकलो. पहिल्यांदाच बोर्ली पंचतन जिल्हा परिषदेचा गड जिंकला परंतु पक्षाने उचलून धरले नाही. जिल्ह्यात नियोजन मंडळात शिवसेनेच्या वाट्याला दरवर्षी ३२ कोटीचा निधी असतो यातील पाच वर्षात काहीच निधी न दिल्याने मी रायगड मधील तिन्ही आमदार, मंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, यांचीही भेट घेतली, संम्पर्क प्रमुख सदानंद धरवल यांचीही भेट घेतली मात्र काही उपयोग झाला नाही. शिवसेनेचा श्रीवर्धन मतदारसंघ हा मोडायला काढला आहे अशी ईच्छा रायगडाच्या सर्वच प्रमुख नेत्यांची असल्याचे सांगितले. श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या नोकरी निमित्ताने भेटायला गेलो असता उलट आमच्या वरच आगपाखड केली की मी कुठे कमी पडलो. मंत्रालया समोरील शिवालयात अक्षरशः भिकारी सारखा फिरलो परंतु कायमस्वरूपी तोंडाला पाने पुसण्यात आली. एकनाथ शिंदे यांची भेट रात्रीच्या वेळेत फक्त दहा मिनिटे दिली तेव्हा ठरले की आदित्य ठाकरे यांच्या दालनात आठ दिवसांत चर्चा करायचे ठरले.आठ आठ दिवस असे करून दोन महिने झाले मात्र काही झाले नाही फक्त वाईट अनुभव वाट्याला आले. ते पुढे म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वाईट अनुभव पहायला मिळाला आहे. आमदार भरतशेठ गोगावले श्रीवर्धन मध्ये पहात नाही, आमदार महेंद्र श्रीवर्धन मध्ये पहात नाही आमदार महेंद्र थोरवे श्रीवर्धन मध्ये पहात नाही कारण या आमदारांनी श्रीवर्धन मतदारसंघात लक्ष दिले तर तिकडे तटकरे त्यांच्या मतदारसंघात लक्ष देतील अश्या दृष्टिकोणातुन श्रीवर्धन मतदारसंघाची वाताहात करुन टाकली आहे. विकासकामे करायला गेलो तर मला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करुनही कोणताही निधी मिळत नसल्याने तसेच वरिष्ठांनी लक्ष न दिल्याने मी उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे सांगीतले व नंतर त्यांना गहिवरून आले.
    उपजिल्हा प्रमुख श्यामकांत भोकरे म्हणाले की दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य होतो. मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा माझ्या समोर अनेक पक्ष होते मात्र या तालुक्यात शिवसेना बलाढ्य पक्ष आहे, सुकुमार तोंडलेकर चांगला पक्ष बांधणी करतो म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला.डोळ्याचे आँपरेशन असतानाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जागा निवडून आणली. न भुतो न भविष्यती असा विजय संपादन केला. खुप निधी येणार असे आम्ही आशा बाळगली परंतु पदरी निराशा पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर महाविकास बिघाडी केली असल्याची शिवसेनेच्याच नेतेमंडळीवर तोफ डागुन आपले मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test