Type Here to Get Search Results !

• आ.अनिकेत तटकरे यांच्या निधीतून मंजूर वासगाव येथील निवारा शेडचे भूमिपूजन संपन्न


• आ.अनिकेत तटकरे यांच्या निधीतून मंजूर वासगाव येथील निवारा शेडचे भूमिपूजन संपन्न


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस कोकणचे भाग्यविधाते रत्नागिरी-रायगड चे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सुनिल तटकरे यांच्या आशीर्वादाने रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे व तरुणांचे आधारस्तंभ तसेच प्रेरणास्थान अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाने आमदारांंच्या स्थानिक कार्यक्रमा अंंतर्गत सन-२०२१ मधील अनिकेत तटकरे यांच्या आमदार निधीतूून मंजूर ३ लक्ष किमतीच्या नागोठणे जवळील ग्रामपंचायत पाटणसई हद्दीमधील मोजे- वासगाव येथेे नवीन निवारा शेड बांधणे या कामाचे भूमिपूजन दि.१६ रोजी माजी पंं.स. सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे व भाई टके यांच्या शुभहस्ते पार पडले. मौजे वासगाव याठिकाणी संपन्न झालेल्या या छोटेखानी भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे पेण सुधागड मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर,नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर,पाटणसईचे माजी सरपंच झिमा कोकरे,जाणू कोकरे,रोहिदास हातलोणकर, ग्रामपंचायत सदस्य मीना दरवडा, ज्योती दरवडा,जगदीश दिवेकर, बाळकृष्ण देवरे,चंद्रकांत बावधाने,हरेश झोरे,हरेश कोकरे यांच्यासह वासगाव येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test