Type Here to Get Search Results !

• पळस विभागात खासदार तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली - शिवरामभाऊ शिंदे • बाहेरशीव येथील श्री मरिआई माता मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा संपन्न


• पळस विभागात खासदार तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली - शिवरामभाऊ शिंदे 

 • बाहेरशीव येथील श्री मरिआई माता मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा संपन्न


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनिल तटकरे यांच्या आशीर्वादाने रायगडच्या पालकमंत्री नामदार अदितीताई तटकरे व तरुणांचे प्रेरणास्थान आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुरावामुळे पळस ग्रामपंचायत हद्दीतील बाहेरशीव येथील श्री मरिआई माता मंदिर जीर्णोद्धारासाठी डोंगरी विकास कामांतर्गत ४ लाख रुपये मंजूर झाल्यानंतर त्या कामाची वर्कऑर्डर देखील पळस ग्रामपंचायतीच्या ताब्यात आली असून सोमवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेरशीव येथील श्री मरिआई माता मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे विभागीय नेते पळस ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शिवरामभाऊ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी पळस विभागात खासदार तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असून यापुढेही विकासकामे होतच राहणार असल्याचे उदगार शिवरामभाऊ शिंदे यांनी उपस्थितीत नेतेगण व ग्रामस्थांना संबोधित करताना काढले. 
          नागोठणे जवळील पळस ग्रामपंचायत हद्दीतील बाहेरशीव येथे श्री मरिआई माता मंदिरातील सार्वजनिक सत्यनारायणाची पूजेचे औचित्य साधून मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजनाचे आयोजन केले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, विभागीय अध्यक्ष तथा पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, कार्याध्यक्ष तथा पाटणसई ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर, रोहा तालुका उपाध्यक्ष अनिल डाकी, युवक राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष तथा वांगणी ग्रा. सदस्य प्रमोद जांबेकर, दिपेंद्र आवाद, पळस ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत भालेकर, नागोठणे पं. स. गण अध्यक्ष विक्रांत घासे, पळस माजी सरपंच हिराजी शिंदे, पळस ग्रा. सदस्य किसन बोरकर, निष्ठा विचारे, सतीश डाकी, राम जोशी, रोहा पं. स. माजी सदस्या बेबीताई नाईक, माजी उपसरपंच रेश्मा जोशी, सचिन जोशी, महेंद्र कदम, प्रकाश कदम,पोलिस पाटील बबन शिंदे , प्रकाश पालांदे , सुरेश नाईक, रामदास कदम आदींसह महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भूमिपूजना पूर्वी उपस्थित नेतेगणांनी श्री सत्यनारायणाची पूजा करून श्री मरिआई मातेचे आशीर्वाद घेतले. 
       शिवरामभाऊ शिंदे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, आज श्री सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे गावात आनंदी वातावरण असून त्यात मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन माझ्या हातून संपन्न झाले म्हणजे हा दुग्धशर्कर योग आहे. पुढील वर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या आगोदर सुसज्ज असे श्री मरिआई मातेचे मंदिर उभे असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. खासदार तटकरे, नामदार तटकरे व आमदार तटकरे यांच्या माध्यमातून पळस विभागात अनेक विकासकामे झालेली आहेत. आताही बाहेरशीव गावातील तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, आदिवासीवाड्यांकडे जाणारा रस्ता आदी विकासकामे प्रगती पथावर असून ते कामे लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांनी ग्रामस्थांना दिली. दरम्यान शिवरामभाऊ शिंदे दिलेला शब्द नेहमीच पाळतात असे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ राम जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप हिराजी शिंदे महाराज यांनी तर आभार प्रदर्शन सचिन जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test