Type Here to Get Search Results !

• नागोठण्यात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने हळदी कुंकू उत्साहात


• नागोठण्यात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने हळदी कुंकू उत्साहात



रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 पारंपारिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपारिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकर संक्रांती.मकर संक्रांत म्हणजे महिलांसाठी महत्त्वाचा सण, हळदी कुंकू कार्यक्रम आणि वाणांची लुट. मकर संक्रांतीत अनेक ठिकाणी महिलांकडून हळदी कुंकूचे आयोजन केले जाते. समाजात असणारे हळदी कुंकूचे महत्त्व जपत गतवर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने नागोठणे येथील शांतीनगर भागात असलेल्या संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात रविवार दि. ३० रोजी सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड उपाध्यक्षा वैशाली मपारा, दक्षिण रायगड उपाध्यक्षा श्रेया कुंटे,मेघना ओक,सुधागड महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष आरती भातखंडे, यशोधरा गोडबोले,रोहा शहर महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती सनलकुमार, उपाध्यक्षा संस्कृती ओक, पाली नगरपंचायतीच्या नगरसेविका जुईली ठोंबरे, पाली शहर महिला मोर्चा अध्यक्षा सई लवाटे, चिटणीस योगिनी भातखंडे,निहारीका शिर्के, रोहा तालुका उपाध्यक्षा अपर्णा सुटे,महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा माधुरी रावकर, तालुका चिटणीस निलिमा राजे यांच्यासह नागोठणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा शितल नांगरे, उत्तर भारतीय सेल महिला मोर्चा शहर अध्यक्षा सोनी पाण्डेय, नागोठणे विभाग सरचिटणीस मुग्धा गडकरी, सोनाली पडवळे,सुखदा वढावकर आदींसह भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच विभागातील महिला उपस्थित होत्या.  
भाजपा संपर्क कार्यालयासमोर संपन्न झालेल्या या हळदी कुंकू कार्यक्रमात नागोठणे शहर व विभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला. यावेळी हळदी कुंकू निमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आलेल्या सर्व महिलांना तिळगुळ व एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. याचबरोबर यावेळी नागोठणे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने एक विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी छोटेखानी अशी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. या उखाणे स्पर्धेत अनेक महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रम अधिक उत्साहवर्धक केला.उखाणे स्पर्धेत विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.दरम्यान या हळदी कुंकू कार्यक्रमावेळी नागोठणे येथील जागृती अमित चौधरी व राधा आनंद मिश्रा या महिलांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रवेशानंतर लगेचच महिला मोर्चा उपाध्यक्षा वैशाली मपारा व जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या उपस्थितीत जागृती चौधरी यांची उत्तर भारतीय सेल महिला मोर्चा उपाध्यक्षा म्हणून तर राधा मिश्रा यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test