Type Here to Get Search Results !

🛑देशसेवेचा ध्यास घेतलेल्या लोहारे गावातील धीरज साळुंखे या जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू, तालुक्यावर शोककळा


🛑देशसेवेचा ध्यास घेतलेल्या लोहारे गावातील धीरज साळुंखे या जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू, तालुक्यावर शोककळा

रायगड वेध पोलादपूर प्रतिनिधी देवेंद्र दरेकर

 पोलादपूर तालुका लढवय्ये चा सैनिकांचा असल्याने तालुक्यातील अनेक गावातील तरुण आर्मी सह जवान मध्ये आपले योगदान देत आहेत तालुक्यातील लोहारे गावातील तरुण जवान धीरज शाम साळूखे याचे एका आजाराने दिल्ली येथे उपचार दरम्यान निधन झाले.धीरज याला काही महिन्यांपूर्वी एका आजाराने त्याला ग्रासले मात्र देशसेवेचा ध्यास मणी असल्याने आजारावर त्याने मात करत पुन्हा सेवेसाठी रूजू झाला मात्र पुन्हा तो आजार पुन्हा उद्भवल्याने दिल्ली येथे आर आर हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून जवळपास पाच वर्षे पेक्षा जास्त देशसेवा त्यांनी केली.धीरज शाम साळुंखे यांचे आजोबा आर्मी मध्ये होते वडील सुद्धा आर्मी मध्ये होते ,भाऊ सध्या आर्मी मध्ये कार्यरत आहे असा संपूर्ण पिढी मिलिटरी तर देश सेवेचा परंपरा करत होती. धीरज याच्या अचानक जाण्याने संपूर्ण तालुका सह मित्रपरिवार शोकसागरात बुडाला बुधवारी दिल्ली येथून त्याची मयत बॉडी मुंबई येथे आणण्यात आली तर रात्री उशिरा पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावात आणण्यात येणार असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test