🛑कामगारांच्या सक्षमीकरणाकरीता व सबलीकरणाकरिता कामगार शिक्षण योजना आवश्यक :- खा.अरविंद सावंत
रायगड वेध कापोली विजय कांबळे
श्रम व रोजगार मंत्रालय ,भारत सरकार अंतर्गत दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड यांच्यावतीने १६ सप्टेंबर हा राष्ट्रीय कामगार शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला .यावेळी ऑनलाईन पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला .यावेळी खासदार ,मा.केंद्रीय मंत्री व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी कार्यक्रमाचे उद्गाटन करून मार्गदर्शन केले.
यावेळी प्र.प्रादेशिक संचालक चंद्रसेन जगताप यांनी कामगार शिक्षण योजना .त्याचे महत्व व आवश्यकता स्पष्ट केली.भारतातल्या कोटयावधी संगठीत व असंगठित कामगारांना शिक्षण .प्रशिक्षण व त्यांच्या विकासाकरिता जनजागृती करणारी एकमेव शासकीय योजना म्हणून कामगार शिक्षण मंडळ देशभर कार्य करीत आहे.म्हणून या संस्थेचा स्थापना दिवस हा कामगार शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या योजनेद्वारे हजारो कामगार शिक्षक ,सामाजिक संस्था ,औध्योदिक नेतृत्व निर्माण करून कामगार विश्वात मोलाची कामगिरी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
या वेळेस प्रादेशिक संचालनालय मुंबई विभागाच्या वतीने 'श्रम संहिता' या ईबुक चे प्रकाशन करण्यात आले.तसेच कामगार चळवळीमध्ये ज्यांनी भरीव योगदान दिले आहे. अशा कामगिरीबद्दल मा. श्री चंद्रकांत कानू खोत (भाऊ) कामगार शिक्षक व ,ऍड.मनीषा बनसोडे,यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.शिवपुत्र कुंभार,प्रो.चंद्रहास गंभीर,एड.अनिल ढुमणे या मान्यवरांची भाषणे झाली .या कार्यक्रमास प्रादेशिक सल्लागार समितीचे सर्व सद्यस्थ , रवींद्र देशपांडे ,अविनाश उपाध्याय ,डॉ.अस्मिता देशमुख ,निवृत्ती धुमाळ ,मारुती विश्वासराव आदी मान्यवर उपस्तित होते.तसेच महाराष्ट्रातून विविध संस्थांचे,कामगार संगठनाचे व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक अधिकारी योगेश लोहकरे यांनी केले.