Type Here to Get Search Results !

🛑पंचायत समिती श्रीवर्धनच्या शिक्षण विभागाच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न


🛑पंचायत समिती श्रीवर्धनच्या शिक्षण विभागाच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

रायगड वेध अभिजीत मुकादम

५ सप्टेंबर शिक्षक दिन. लहान मुलांना ज्ञान दानाचे व आर्दश नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील १३ नवोपक्रम शील व २ रायगड जिल्ह्यास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांना श्रीवर्धनच्या गटशिक्षणाधिकारी सौ. शितल तोडणकर यांच्या शुभहस्ते श्रीवर्धन तालुका शिक्षण विभागाच्या वतीने विशेष सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
ज. शि. पवार (रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार), जयवंत लाखण (राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार), संदिप भायदे (आर्दश शाळा भरडखोल), परशुराम बिराडी (राजिप शाळा मेघरे भरडोली), श्रीम. अंजुम शेख (राजिप बोर्ली उर्दू), विजय काचुळे (शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा बागमांडले), भिकू पांगारकर (आर्दश शाळा वाकलघर), भगवान पाटील (राजिप मराठी शाळा कुडगाव), श्रीम. कविता कर्णेकर (राजिप शाळा गालसुरे), दिपक खोत (आर्दश शाळा वडवली), इंद्रजित साळुंखे (कारिवणे शाळा), प्रशांत वाणी (आर्दश शाळा शेखाडी), सुधीर राऊत (रा. पा. दिवेकर दांडगुरी हायस्कूल), सिद्धेश्वर अंजर्लेकर (अ.स.ई. अंतुले हायस्कूल दिघी), आदींना उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन पहिल्यांदाच अशाप्रकारे श्रीवर्धन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला. त्याबद्दल तालुक्यातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test