टिम रायगड वेध
प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे. सन २०२१ मध्ये पितृपक्ष कधी आहे? पितृपक्षाचे महत्त्व व मान्यता यांविषयी जाणून घेऊया...
श्राद्धविधी
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजेच मृत पूर्वज कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते.
सर्वपित्री अमावास्या
सन २०२१ मध्ये बुधवार, ६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला महालयाचा अखेरचा दिवस असेल. श्राद्धविधी करण्याचा हा अखेरचा दिवस. ६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला मोठ्या प्रमाणात श्राद्धविधी केले जातात. ज्यांचा मृत्युदिन नक्की माहिती नाही त्या सर्व पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. म्हणून त्यास सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. शास्त्रवचन भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे, असे आहे. दरवर्षी निधनतिथीला वर्षश्राद्ध केले जाते