Type Here to Get Search Results !

🛑विज ग्राहकांच्या समस्यांबाबत म्हसळा तालुका शिवसेना संघटनेच्या आंदोलनाची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली दखल.🛑 विज वितरण कंपनी कडुन कर आकारणी करण्यासाठी पंचायत समितीना दिले निर्देश


🛑विज ग्राहकांच्या समस्यांबाबत म्हसळा तालुका शिवसेना संघटनेच्या आंदोलनाची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली दखल.

🛑 विज वितरण कंपनी कडुन कर आकारणी करण्यासाठी पंचायत समितीना दिले निर्देश

रायगड वेध म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यात विज वितरण कंपनीची ग्राहक व्यवस्था कोलमडली आसुन विज कंपनीने आम जनतेला वेठीस धरले आहे. वारेमाप विज बिल आकारून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने पठाणी वसुली सुरू करून ग्राहकांना अक्षरशः नाडत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात बंद करण्यात आलेले पथदिवे कंपनीने सणासुदीला सुरू करावेत. अनेक ग्राम पंचायत हद्दीत परवानगी न घेता विज वितरण कंपनीने विज तट्रान्सफार्मर,विजेचे खांब उभे करून जागेची अडवणूक केली आहे त्या बलकावलेल्या जागेचा भाडा विज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीकडे जमा करावा, विज वितरण कंपनीच्या विजवाहक तारांमध्ये स्पार्क होऊन जंगलात वणवे लागुन अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जळून खाक हातात त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशा मागण्या तालुका शिवसेना संघटनेने तहसीलदार म्हसळा व पोलीस निरीक्षक म्हसळा यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे. दिलेल्या निवेदनाची व तक्रारीची म्हसळा तालुका विज वितरण कंपनीने दखल न घेतल्यास तीव्र जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. दिलेल्या निवेदनाची रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने वेळीच दखल घेत दिनांक 20-08-2021 रोजी संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून विज वितरण कंपनीने जिल्ह्यातील संबंधित ग्राम पंचायत हद्दीत ठीकठिकाणी उभे केलेले विज वाहिनीचे टॉवर, ट्रान्सफार्मर आणि विज वाहक तारांसाठी उभारण्यात आलेल्या खांबवर योग्य ते कर आकारणी करण्याबाबतचे आदेश पत्र रायगड जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.तसेच पुढील कार्यवाहीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कळविले असल्याचे सांगण्यात आले.
   म्हसळा तालुका शिवसेना संघटनेच्या जनहिताच्या मागणीची रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दखल घेतल्याने माजी सभापती महादेव पाटील,माजी तालुका प्रमुख रविंद्र लाड यांनी धन्यवाद दिले आहेत. जिल्हा परिषदेने विज वितरण कंपनी कडुन कर वसुली बाबतीत घेतलेला निर्णय जिल्ह्यातील सर्वच ग्राम पंचायतीना होणार असल्याचे गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी माहिती देताना सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test