Type Here to Get Search Results !

🛑मांदाडकरांचा पाणीपुरवठा सुरळित;पाण्याच्या टाकीचे भाजपा आ.रमेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण


🛑मांदाडकरांचा पाणीपुरवठा सुरळित;पाण्याच्या टाकीचे भाजपा आ.रमेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

वर्षानुवर्षे सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी वंचित असलेल्या मांदाडकरांना आता सुरळीत पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा विधान परिषद आ. रमेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन नवीन पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले यामुळे मांदाड भागात पाण्याची साठवणुक आणि वितरण चांगल्या प्रकारे होणार आहे.पाण्याच्या टाकीमुळे या भागात भविष्यात २४ तास पाणी पुरवठ्याचे वितरण करता येणार आहे. पाण्याच्या टाकीचे लोकार्पण झाल्यानंतर मांदाड ग्रामस्थांच्या वतीने आ.रमेशदादा पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला, या सत्कार समारंभास कोळी महासंघाचे सचिव श्री.दबके,भाजपा मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष अॅड.चेतन पाटील,भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तळा तालुका माजी अध्यक्ष कैलास पायगुडे, माांदाड ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.आ.रमेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, आजच्या या सत्काराने मी भारावुुुन गेेेेलो आहे, गेली अनेक वर्षे येथील लोकप्रतिनिधी पाण्यासारखी मुलभुत सुविधा सर्व सामान्य जनतेला देत नाही ही खुपच खेदाची गोष्ट आहे, मी तुम्हाला माझ्या आमदारकीचा निधी दिला म्हणजे मी तुमच्यावर उपकार केले असा कोणताही भाग नसुन ते माझे कर्तव्य आहे माझ्या आया बहीणींच्या डोक्यावरिल हंडा मी खाली उतरवला याचे समाधान असुन अजुन विकासकामे करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.      
           या लोकार्पण सोहळ्यास कोळी बांधवांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता गेली पंधरा वर्षे अनेक राजकारणी, लोकप्रतिनिधी आले आणि गेले परंतु मांदाड वासियांचा पाण्याचा प्रश्न कोणीच सोडविला नव्हता चक्री वादळात कोणीही न सांगता आ.रमेश पाटील आले आणि त्यांनी रहाटाड,मांदाड येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली आणि मदत करण्याचे केेेवळ आश्वासन न देता वचनपुर्ती केली त्यामुळे सर्व कोळी बांधव भारावून गेले होते. निसर्ग चक्री वादळामुळे तळा तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते विशेष करुन खाडी पट्ट्यातील गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली होती या चक्री वादळाचा फटका खाडी शेजारी असणारया कोळी बांधवांना देखील मोठ्या प्रमाणात बसला होता कोळी बांधवांचे पूर्ण कंबरडेच मोडले होते तळा तालुक्यातील कोळी समाज बांधवांची चक्री वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती या दौरया दरम्यान मांदाड येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची समस्या आ.रमेश पाटील यांच्य्या समोर माांडली होती, पाण्या सारख्या ज्वलंत समस्येची तात्काळ दखल घेऊन रमेश पाटील यांनी कमी वेळेत काम पूर्ण करुन मांदाड ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test