Type Here to Get Search Results !

🛑पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कापडे खु येथे सभागृहाचे उद्घाटन व निवे येथे सभामंडपाचे भूमिपूजन 🛑पोलादपूर तालुक्यतील विकास कामे मार्गी लावणार - ना आदिती तटकरे


🛑पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कापडे खु येथे सभागृहाचे उद्घाटन व निवे येथे सभामंडपाचे भूमिपूजन
 
🛑पोलादपूर तालुक्यतील विकास कामे मार्गी लावणार - ना आदिती तटकरे

रायगड वेध पोलादपूर देवेंद्र दरेकर

पोलादपूर तालुका संपूर्ण दुर्गम तालुका असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांच्या सह पदाधिकारी याच्या मागणी नुसार विविध विकास कामे आपण पालकमंत्री या नात्याने मार्गी लावणार असून खासदार निधी मधील मोलाचा वाटा पोलादपूर साठी देण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री ना आदीतीताई तटकरे यांनी पोलादपूर तालुक्यातील कापडे व निवे येथील सभागृहच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला 
      पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हसत कापडे खु येथे सभागृहाचे उद्घाटन व निवे येथे सभामंडपाचे भूमिपूजन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आले त्या पूर्वी पोलादपूर तालुका वाचनालय मध्ये लोखंडी कपाट प्रदान करण्यात आले 
      यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमाताई जाधव,राजीप सदस्य सुमनताई कुंभार, तालुका अध्यक्ष वाय सी जाधव, शहराध्यक्ष अजित खेडेकर,महिला तालुका अध्यक्ष प्रतिभा पवार, देवळे गणाध्यक्ष विठोबा पार्टे, कोंडवी गणाध्यक्ष बारकू शिंदे, खेडेकर बुवा,कृष्णा करंजे,युवा नेते अभंग जाधव यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
    या वेळी बोलताना कापडे येथील सभागृह ची वास्तू दर्जेदार असून तालुक्यातील गावगवात अशी वास्तू असणे गरजेचे आहे तालुक्यातील अनेक पदाधिकारी संघटना यांनी निवेदन दिले आहेत त्याचा विचार केला जाईल असे सांगून नैसर्गिक आपत्ती नंतर पोलादपूर वासीयांना एक मेकांना मदत केल्याचे सांगून त्याचा अभिमान असल्याचे सांगत आपलं पालकमंत्री या नात्याने पोलादपूर मध्ये मदत केली असल्याचे सांगत गेली दीड वर्षे आपण कोरोना महामारी चा सामना करत आहोत त्या परिस्थितीत विकास कामे सुद्धा मार्गी लावत आहेत आगामी काळात खासदार निधी मिळेल त्यातील मौलाच वाटा पोलादपूर साठी देण्यात येणार असल्याचे अभिवचन देत तालुक्या साठी निधीची कमतरता कमी पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test