Type Here to Get Search Results !

🛑जिंदाल स्कुलच्या प्राचार्या सविता शर्मा यांना सी व्ही रमण ॲवार्डने सन्मानित.


🛑जिंदाल स्कुलच्या प्राचार्या सविता शर्मा यांना सी व्ही रमण ॲवार्डने सन्मानित.

रायगड वेध नागोठणे अनिल पवार

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या प्राचार्या श्रीमती सविता शर्मा यांना नुकताच प्रथम सी व्ही रमण एज्युकेशन ॲवार्ड देऊन गौरविण्यात आले. हा ॲवार्ड त्यांना एक्सलन्स ईन लिडरशिपसाठी सी व्ही रमण एज्युकेशन सोसायटीद्वारे शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व प्राचार्यांना हा सी व्ही रमण एज्युकेशन ॲवार्ड येतो. श्रीमती सविता शर्मा यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा देण्यात आला. सी व्ही रमण एज्युकेशन ॲवार्ड साठी देशभरातुन ३० हजाराहुन अधिक शिक्षक व प्राचार्यांनी अर्ज केले होते. या‌ सर्वांमधुन जिंदाल स्कुलच्या प्राचार्या श्रीमती सविता शर्मा यांची निवड झाली. याआधिदेखील श्रीमती सविता शर्मा यांना विविंध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या सी व्ही रमण  ॲवार्डने संपुर्ण रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्रीमती सविता शर्मा यांच्या या यशाबद्दल त्यांचे जिंदाल स्कुल व्यवस्थापन तसेच शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test