🛑म्हसळ्यात अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन उत्साहात
रायगड वेध म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर
दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज म्हसळा शहरातील व तालुक्यातील सुमारे ६४० गणपती बाप्पाचं विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं ढोल ताशांचे गजरांत व फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन झाले. शहरांत वंजारा समाजाचा एकच गणपती सार्वजनिक होता व बहुतांश गणपती खाजगी आसल्याने कुटुंबातीत महिला वर्ग - लहान मोठी मुले मोठया संखेने सामिल होती, सर्वच जण पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देत होते. मात्र कोविडच्या नियमांमुळे यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला गेला. म्हसळा शहरात पाच गाव आगरी समाज, सावर नदीच्या संगमावर आणि हिंगुळंडोह या तीन वीर्सजन घाटावर गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस स्टेशनचे सपोनी उद्धव सुर्वे यानी २ आधिकारी व २५ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते.