Type Here to Get Search Results !

🛑कृषी विभागांतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांकरिता 1 लाख ते 1 कोटी पर्यंत प्रोत्साहन योजना .


🛑कृषी विभागांतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांकरिता 1 लाख ते 1 कोटी पर्यंत  प्रोत्साहन योजना .

रायगड वेध माणगाव गिरीश गोरेगावकर

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत सन 2021- 22 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP-One District One Product) या आधारावर राबविली जात  आहे. सदर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना (Vocal for Local) प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे उत्पादनांवर आधारित वैयक्तिक  सूक्ष्म  अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक कंपनी गट,  संस्था , स्वयंसहायता गट व सहकारी दुध उत्पादक संस्था यांची पत मर्यादा वाढवणे, उत्पादनाचे ब्रॅण्डिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठासाखळीशी जोडणे, सामायिक सेवा जसे की सामायिक प्रक्रिया, सुविधा साठवणूक , पॅकेजिंग, विपणन ,तसेच उद्योग वाढीसाठी च्या सर्वकश सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.  हा प्रकल्प अहवाल बनवणे, ऑनलाईन अर्ज करणे, बँकांशी पाठपुरावा करू विविध परवाने काढणे इत्यादीसाठी संसाधन व्यक्ती यांचेकडून विनामूल्य मदत मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वैयक्तित लाभार्थी, भागीदारी संस्था,  बेरोजगार युवक,  महिला,  प्रगतशील शेतकरी लाभ घेऊ  शकतात,  या उद्योगांमध्ये दहापेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत,  अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा,  अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावा व  एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल, सदर उद्योगाला औपचारीक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी, पात्र प्रकल्प किमतीच्या किमान 10 ते 40 टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित रक्कम बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी, 
या योजेअंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड सागरी उत्पादने या घटकासाठी करण्यात आली आहे.  या सागरी उत्पादनामध्ये मत्स्य उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग, माशांपासून लोणचे बनवणे , सुकवलेले मासे, डबाबंद मासे,  खारवलेले मासे , शीतगृह उभारणे, वाहतूक व विक्री व्यवस्था इत्यादी व्यवसायांसाठी अनुदान उपलब्ध आहे,  या योजनेअंतर्गत बँक निगडीत प्रकल्पांना 35 टक्के अनुदान असून जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत अनुदान उपलब्ध केला जाणार आहे, तसेच या योजनेतून सागरी उत्पादने वगळून तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत चालू असलेले कोणतेही अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये राईस मिल, पोहा मिल,  काजूप्रक्रिया, पापड उद्योग, मसाला कांडप, नाचणी  प्रक्रिया, फळप्रक्रिया, व इतर गृहउद्योग यांना 35 टक्के अनुदान दिले जाणार आहे , या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी  प्रक्रिया धारकांनी   http://pmfme.mofpi.gov.in/mis  या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव येथील श्री प्रमोद शिंदे संपर्क क्रमांक 9168777299, श्री राहुल जोशी  संपर्क  क्र.9423893650 अलिबाग,  यांचे समवेत संपर्क करावे. या योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त मत्स्य उत्पादक कोळंबी संवर्धन करणारे शेतकरी व इतर अन्न प्रक्रिया करणारे उद्योग यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान श्री आर.डी.पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test