Type Here to Get Search Results !

🛑तळावासीयांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.-पो.नि. गोविंद ओमासे


🛑तळावासीयांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.-पो.नि. गोविंद ओमासे

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

गणेशोत्सव काळात तळावासीयांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी तळा तालुक्यातील नागरिकांना केले.तळा तालुक्यात एकही सार्वजनिक गणपतीची स्थापना झालेली नाही परंतु संपूर्ण तालुक्यात ४१९८ खाजगी गणपतींची स्थापना करण्यात आलेली आहे.त्यामुळे विसर्जनाला नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी तालुक्यातील १४०८ दीड दिवसांच्या गणपतींचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले.त्याचप्रमाणे पाच दिवसांच्या गणपतींचे देखील साधेपणाने व शांततेत विसर्जन करावे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क वापरणे,सॅनिटाइजर चा वापर करणे व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन देखील पो.नि.गोविंद ओमासे यांनी तळा तालुक्यातील नागरिकांना केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test