Type Here to Get Search Results !

🛑तळा तालुक्यात आज गौरी गणपतींचे विसर्जन.विसर्जन साधेपणाने करण्याचे प्रशासनाचे आवाहन


🛑तळा तालुक्यात आज गौरी गणपतींचे विसर्जन.
विसर्जन साधेपणाने करण्याचे प्रशासनाचे आवाहन

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा तालुक्यात शुक्रवारी विराजमान झालेल्या गणपतींचे तसेच रविवारी आगमन झालेल्या गौराईंचे आज विसर्जन करण्यात येणार आहे. तालुक्यात एकही सार्वजनिक मंडळाचा गणपती विराजमान झालेला नाही परंतु ४१९८ खाजगी गणपतींची स्थापना झाली असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या गणपतींचे साधेपणाने विसर्जन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.विसर्जनाला कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली नसून विसर्जनाला पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच नगरपंचायतीकडून शहरातील विसर्जन घाटावर निर्माल्य कलश व कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी सर्व निर्माल्ये कलशामध्ये टाकावे तसेच गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test