Type Here to Get Search Results !

🛑चार दिवसांवर गणेशोत्सव आला असतानाही तळा बाजारपेठत मात्र शुकशुकाट🛑व्यापारी वर्गात चिंतेचे वातावर


🛑चार दिवसांवर गणेशोत्सव आला असतानाही तळा बाजारपेठत मात्र शुकशुकाट

🛑व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

दरवर्षी गणेशोत्सव काळात पंधरा दिवस आधीपासूनच गजबजलेली तळा बाजारपेठ आता अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यासाठी जवळपास दहा ते पंधरा दिवस आधीपासूनच नागरिक गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव व त्यामुळे करण्यात येणारे लॉकडाऊन यामुळे लहानमोठ्या उद्योगांना याचा फटका बसून अनेक उद्योग बंद देखील पडले आहेत. परिणामी नागरिकांच्या नोकरीवर गदा येऊन अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे.हातात पैसे नसल्यामुळे खरेदीच्या बाबतीत सर्वच गोष्टीत हात आखडता घेतला जात आहे. याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर झाला असून अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाही नाकरिकांची खरेदीसाठी गर्दी होत नसल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या दुकानात सामान भरले असून गणेशोत्सवात दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते परंतु अद्यापही खरेदीसाठी ग्राहक बाहेर पडले नसल्याने मालाचे पैसे उभे कसे करावे हा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावत आहे.


दरवर्षी गणेशोत्सवात ग्राहक दहा ते पंधरा दिवस अगोदरच खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.परंतु यावर्षी गणेशोत्सव तोंडावर आला असूनही बाजारपेठेत ग्राहकांची कमतरता भासत आहे.दुकानात मोठ्या प्रमाणावर माल भरला आहे परंतु ग्राहक कमी असल्याने मालाचे पैसे कसे उभे करावे हाच मोठा प्रश्न आहे.
(रतन चौधरी व्यापारी)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test