Type Here to Get Search Results !

🛑गोरेगांव दत्तमंदिर मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न


🛑गोरेगांव दत्तमंदिर मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

रायगड वेध माणगाव प्रतिनिधी गिरीश गोरेगावकर

        श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवली गोरेगांव आयोजित लोणेरे गोरेगांव विभागातील कुणबी समाजातील 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात 10 वी 12 वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवून उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा गोरेगांव येथील दत्त मंदिरामधील सभागृहात अनेक समाजातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.  
            सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार, दिपप्रज्वलन करून , कुणबी बहुजनांच्या महामानवांना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी ट्रस्टचे माजी अध्यक्ष चाळके यांनी मार्गदर्शन केले तसेच माजी सभापती महेंद्र तेटगुरे यांनी बोलताना कल्याणी करकरे हिने सर्वोत्तम गुण मिळवत 10 वी आणि 12 वी मध्ये ना म जोशी शाळेत प्रथम येऊन समाजाचं नाव मोठं केलं आहे.समाजातील विद्यार्थी टँलेंट आहेत हे यातून अधोरेखित झाले आहे . माञ सर्वसामान्य पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. यापुढील शैक्षणिक वाटचाल करताना मुलाचा कल बघून योग्य ते क्षेञ निवडले पाहिजे. कोणते क्षेञ निवडावे यासाठी काही पालकांची गफलत होत असेल तर त्यांनी योग्य व्यक्तिकडून मार्गदर्शन घ्यावे.यावेळी रायगड प्रीमियम क्रिकेट लीग साठी निवड झालेल्या केतन भोस्तेकर याचा देखील सत्कार करण्यात आला. 
      या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे माजी अध्यक्ष अरुण चाळके , नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश टेंबे , माजी सभापती महेंद्र तेटगुरे उद्योगपती सीताराम उभारे, माजी पंचायत समिती सदस्य नथुराम करकरे , कुणबी युवा मंचाचे उपाध्यक्ष सुधाकर करकरे , संतोष शिंदे ,वामन बैकर, पंढरी शेडगे, मधुकर नाडकर , राजाराम टेंबे , यावेळी प्रास्ताविक-सुञसंचलन, श्री. संतोष भात्रे सर यांनी केले.यावेळी ट्रस्टचे हितचिंतक विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test