Type Here to Get Search Results !

🛑तळा शहरात मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई


🛑तळा शहरात मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा शहरात सोमवारी रात्री मटका अड्डयावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १९३० रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा शहरातील बसस्थानकाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या गल्लीत मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवार दि.३० रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता आरोपी राजेंद्र हरिशचंद्र जाधव हा मटका जुगाराचे साहित्य बाळगून स्वतःच्या फायद्याकरिता लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवीत असताना आढळून आला.त्यामुळे पोलिसांनी आरोपीसह जनार्दन नथुराम मोरे व महादेव नाना सालेकर यांना ताब्यात घेऊन तळा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर जुगार अधिनियम १८६७ कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.आर आर सानप हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test