Type Here to Get Search Results !

🛑तळा शहरातील खड्डयांवर ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी🛑नागरिकांनी व्यक्त केले समाधान


🛑तळा शहरातील खड्डयांवर ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी

🛑नागरिकांनी व्यक्त केले समाधान

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवर ठेकेदाराकडून तात्पुरती स्वरूपाची डागडुजी करण्यात आली आहे.यामुळे नागरिकांना होणारा त्रास काही प्रमाणात का होईना कमी झाला असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.तळा शहरातील बाजारपेठेत पावसाळ्यापूर्वी पडलेल्या या खड्डयांची अवस्था पावसाळा संपत आल्यानंतरही जैसे थे च होती.बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पडलेल्या या खड्डयांमुळे बाजारपेठेत येणारे नागरिक ,आसपासचे व्यावसायिक,तसेच वाहन चालक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी माधुरी मडके यांना निवेदन देऊन गणपती पूर्वी हे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी केली होती. तसेच या खड्डयांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या देखील झळकल्या होत्या.याबाबत नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराकडून गणपती पूर्वी खड्डे बुजविले जातील असे सांगण्यात आले होते.परंतु गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील खड्डे बुजविण्यात न आल्याने यावर्षी गणरायाचे आगमन खड्डयातूनच होणार असल्याचे दिसून येत होते.परंतु उशिरा का होईना नगरपंचायत प्रशासनाला जाग येऊन अवघे तीन दिवस असताना तळा शहरातील खड्डे बुजविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test