Type Here to Get Search Results !

🛑मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पेण-बोरगांव रस्त्याची ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दैना


🛑मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पेण-बोरगांव रस्त्याची ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दैना

🛑रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठया खड्याचा व चिखलाचा नागरिकांना होतोय त्रास

🛑ठेकेदाराबरोबरच ग्रामपंचायत व नगरपालिकेला सोयर ना सुतक!

रायगड वेध पेण प्रतिनिधी प्रशांत पोतदार  

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पेण-बोरगाव रस्त्याचे ठेकेदाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः दैना उडाली आहे येथील रस्त्याला मोठं मोठे खड्डये पडले असून पसरत असलेल्या चिखलाच्या साम्राज्या मुळे येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत परंतु ठेकेदाराबरोबरच येथील ग्रामपंचायत व नगरपालिकेला याचे किठलेही सोयर सुतक नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलण्यात येत आहे.
पेण शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर असणाऱ्या बोरगांव गावाला जोडणाऱ्या पेण - बोरगांव रस्त्याचे रुपांतर खड्डयात झाले आहे. २०१६ साली सुरुवात केलेल्या आणि २०१८ साली मुख्यमंत्री ग्रामसड़क योजनेतुन हा रस्ता ६.१२० किमी लांबीचा (पेण ते धनगरमाळ रास्ता) बनवण्यात आला आहे. याचा ठेका घेऊन ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचा रस्ता तयार केला असल्याचे रस्त्याला पडलेल्या मोठं मोठया खड्यांवरून दिसून येत आहे.
पेण ते बोरगांव या २ किमीच्या रस्त्यांत जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे एक फुट खोल आणि ३ ते ४ फुट लांबीचे असल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना येथून जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. 
रस्ता बांधून पूर्ण झाल्यापासून ५ वर्षाच्या काळात संबंधित ठेकेदाराला सदरील रस्त्याच्या डागडुजीचा खर्च करायचा असतो मात्र गेल्या ४ वर्षात हा रस्ता दर वर्षी फुटत असल्याने येथील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे मात्र ठेकेदाराकडू पावसाळ्या अगोदर थातुरमातुर डागडुजी करण्यात आली असल्याने परिणामी रास्ता जैसेथे तसाच खड्डेमय झाला आहे.या बोरगांव ग्रामपंचायतीच्या आखत्त्यारित येणाऱ्या रास्त्याकडे ग्रामपंचायत डोळेझाक करीत आहे, तर पेण नगरपालिका परिषद मात्र जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलण्यात येत आहे.याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बोरगांव ग्रामपंचातीच्या हद्दितील शेकडो नागरिक या धोकादायक रस्त्यावरून नाईलाजास्त 
व ये जा करत आहेत.तसेच वाहनांच्या डागडूजीचा खर्च ही या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांचा वाढत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test