Type Here to Get Search Results !

🛑हरिहरेश्वर येथे सेंद्रिय व विषमुक्त शेती बद्दल मार्गदर्शन संपन्न


🛑हरिहरेश्वर येथे सेंद्रिय व विषमुक्त शेती बद्दल मार्गदर्शन संपन्न

रायगड वेध हरिहरेश्वर ग्रिसीन साखळे

आजच्या युगात पारंपरिक शेती मागे पडत असून यात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर करून शेती उत्पन्न वाढवले जात आहे. उत्पन्न वाढी साठी रासायनिक खते आणि कीटकनाशक वापरून विषयुक्त अन्नधान्य आपण उत्पादित करत आहोत आणि आपले आरोग्य आपणच खराब करून घेत आहोत. याच पार्श्वभूमी वर स्वस्थ आरोग्यासाठी सेंद्रिय शेती चा पाठपुरावा होत आहे. अभिनव फार्मर्स क्लब चे संस्थापक व सेंद्रिय तसेच विशमुक्त शेती चे प्रणेते ज्ञानेश्वर बोडके (माऊली) यांनी आज हरिहरेश्वर मंदिर येथील भक्तनिवास चे सभागृह येथे सेंद्रिय व विषमुक्त शेती बद्दल योग्य मार्गदर्शन केले. प्रसंगी मा. श्री संजय वायल (पाटील) (ईश वेद बायोटेक प्रा. ली.)उपस्थित होते तसेच हरेश्वरचे सरपंच  अमित खोत, उपसरपंच  विजय पाटील, हरिहरेश्वर देवस्थान चे अध्यक्ष  वामनाराव बोडस, सचिव सिद्धेश पोवार, तसेच पंचक्रोशी मधील प्रगतशील शेतकरी हिदायत कुदृते, ओमप्रकाश कोलथरकर, वैभव जोशी, नझीर शिरगांवकर, राजन जोशी, दिलीप दळवी,  सुकृत कोलथरकार, सुधीर जाधव,  सुनील खळे, गजानन निंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिक माहिती साठी अभिनव फार्मर्स क्लब च्या संकेत स्थळा वर भेट द्या आणि सेंद्रिय व विशमुक्त शेती मध्ये सहभागी व्हा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test