Type Here to Get Search Results !

🛑ओबीसी आरक्षणाबाबत तळा भाजप तर्फे निवेदन


🛑ओबीसी आरक्षणाबाबत तळा भाजप तर्फे निवेदन

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा भाजप तर्फे ओबीसी आरक्षणा बाबत तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे त्यामुळे हे आरक्षण पूर्ण स्थापित होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच येणाऱ्या काळात ज्या निवडणूका आहेत त्या न घेण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षातर्फे नेहमी महाविकास आघाडी सरकारला निवेदने, मागण्या करूनही राजकीय आरक्षणाबाबत अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.तसेच हे सरकार न्यायालयात ओबीसी आरक्षणाबद्दल बाजू मांडण्यास कमी पडले असल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.त्यामुळे तळा भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.यांसह ओबीसींचा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेऊ नयेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष ऍड निलेश रातवडकर, शहर अध्यक्ष सुधीर तळकर व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test