🛑तळा तालुक्यात आयडिया वोडाफोन नेटवर्क चे तीनतेरा
🛑तालुक्यातील आठ ते दहा दिवसांपासून नेटवर्क गायब
रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर
तळा तालुक्यात आयडीया वोडाफोन नेटवर्क चे तीनतेरा वाजले असून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील आयडीया वोडाफोन चे नेटवर्क गायब आहे.त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या कंपन्यांचे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आयडीया व वोडाफोन चे सिमकार्ड वापरणारे ग्राहक असून गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन्ही कंपन्यांच्या सीमकार्ड चा वापर ग्राहकांकडून करण्यात येत आहे असे असूनही या कंपन्यांकडून ग्राहकांना चांगली सुविधा मिळत नाही. पूर्वी आयडीया व वोडाफोन या वेगवेगळ्या असणाऱ्या कंपन्या एकत्रित येऊन विआय म्हणून काम करू लागल्या.यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता परंतु हा अंदाज सपशेल अपयशी ठरला असून ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे. सध्या सर्वत्र सीईटी च्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आपला तालुका सोडून ईतर ठिकाणी जावे लागत आहे. आशावेळी आपला मुलगा अथवा मुलगी आपल्या इच्छितस्थळी सुखरूप पोहचले आहेत की नाही म्हणून त्यांना दूरध्वनी करायचं झालं तर नेटवर्क च्या अभावामुळे आपल्या पाल्यांसोबत पालकांचे संभाषण होत नाही. अशावेळी आपली मुले ठीक असतील की नाही अशी चिंता पालकांना सतावू लागते.आपल्या जवळच्या व्यक्ती,दूरचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्याशी संपर्क करता यावा यासाठी नागरिक जवळपास महिनाभराचा रिचार्ज करतात.परंतु महिण्यातील दहा दिवस नेटवर्क च उपलब्ध नसल्यामुळे कंपनीकडून ग्राहकांची एकप्रकारे आर्थिक लूट केली जात आहे असा आरोपही या कंपनीच्या ग्राहकांकडून करण्यात येत आहे.