Type Here to Get Search Results !

🛑पत्नीची हत्या करून जंगलात लपलेल्या आरोपीच्या कोलाड पोलिसांनी आवळल्या मुसक्या


🛑पत्नीची हत्या करून जंगलात लपलेल्या आरोपीच्या कोलाड पोलिसांनी आवळल्या मुसक्या  


रायगड वेध अनिल पवार  नागोठणे 

किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी जंगलात लपलेल्या खुनी पतीच्या कोलाड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 
 यासंदर्भात कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (31 ऑगस्ट) रोजी रात्री नऊ ते बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री नऊ यादरम्यान ही घटना घडली होती. कोलाड विभागातील आंबिवली आदिवासीवाडी (पो. कुडली, ता.रोहा) येथे राहणार्‍या चंदर सुदाम वाघमारे याचे पत्नी कुसुम हिच्याशी कोळशाच्या खाणीच्या धंद्यावर जाण्यावरुन भांडण झाले. हा वाद विकोपाला पोहोचला. संतापाच्या भरात चंदरने पत्नी कुसुमला हाताबुक्क्याने, लाथेने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुसूमचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्यातील आरोपी पती गुन्हा करून पसार झाला होता. यानंतर कोलाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाकडून जंगलात झाडावर लपून बसलेल्या आरोपी पती चंदर वाघमारे याला गुरुवारी (2 सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test