Type Here to Get Search Results !

🛑म्हसळा प्राथमिक शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट संघटने तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान


🛑म्हसळा प्राथमिक शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट संघटने तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रायगड वेध म्हसळा -प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षक वर्गाने म्हसळा तालुक्यातील शिरपेचात मानाचा तुरा रोवुन तालुक्याचे शैक्षणिक क्षेत्रातील नाव उज्वल केले आहे. शिक्षकवृंद नवनवीन उपक्रमात नाविन्यपूर्ण काम करत तालुक्यात गुणवान विद्यार्थी घडवत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात म्हसळा तालुक्याचा विकासात्मक आलेख वाढवून देण्यासाठी शिक्षक वर्गाचा मोठा वाटा आहे. नुकताच सोनी मराठीवर संपन्न झालेल्या "कौन बनेगा करोडपती" या कार्यक्रमात दैदिप्यमान कामगिरी करून म्हसळा तालुक्याचे नावलौकिक केलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ म्हसळा संघटनेचे कणघर केंद्राचे केंद्र प्रतिनिधी पवन आडवळे तसेच संघटनेच्या रिक्त झालेल्या तालुका कोषाध्यक्षपदी अवधूत पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा म्हसळा प्राथमिक शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट संघटनेने मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करून सत्कार केला. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष नरेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मोरेसर आदि सहकारी शिक्षक सभासदांनी मनोगत व्यक्त करून गुणवान शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सरचिटणीस आण्णासाहेब बिचुकले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test