Type Here to Get Search Results !

🛑महा आवास अभियान अंतर्गत म्हसळा पंचायत समितीला "सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्काराने" सन्मानीत


🛑महा आवास अभियान अंतर्गत म्हसळा पंचायत समितीला "सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्काराने" सन्मानीत

रायगड वेध म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण विभाग गृहनिर्माण महाआवास अभियान अंतर्गत सन 2020-2021वर्षासाठी राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभाग स्तरीय घेण्यात आलेल्या उपक्रम स्पर्धेत रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा तालुका पंचायत समितीचा "सर्वोत्कृष्ट तालुका"पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन 2020/21 मध्ये झालेल्या निवड स्पर्धेत राज्य शासनाने म्हसळा पंचायत समितीचे
महा आवास अभिमान-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून 'सर्वोत्कृष्ट तालुका' या प्रकारात प्रथम पुरस्कारासाठी निवड केली. कोकण विभाग, कोकण भवन येथे संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यात म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छायाताई म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांचा कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील (भा.प्र.से.)यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजित सत्कार कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी,मुख्याधिकारी डॉ.किरण पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. महा आवास अभियान स्पर्धेत म्हसळा तालुका पंचायत समितीने सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त केल्याने सर्वच स्तरांतून तालुका सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,पंचायत समितीचे सदस्य मधुकर गायकर,सदस्या उज्वला सावंत,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,आणि प.स. अधिकारी वर्गाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.


● म्हसळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचे सातत्याने मिळत असलेले योगदान,मार्गदर्शन आणि त्यांच्या कृपाशीर्वादामुळेच म्हसळा तालुका पंचायत समितीला वरील पुरस्कार प्राप्त होण्यास मदत झाली आहे. पुरस्काराने झालेला सन्मान आमच्यासह तटकरे साहेबांच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे.
सौ.छायाताई म्हात्रे,
सभापती - पंचायत समिती म्हसळा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test