🛑चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड यांचे कडुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोर्लीपंचतन येथे बोर्लीचा राजाच्या प्रांगणात कराटे प्रात्यक्षिक संपन्न
रायगड वेध अभिजीत मुकादम
चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड यांचे कडुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोर्लीपंचतन येथे बोर्लीचा राजा च्या प्रांगणात कराटे प्रात्यक्षिक संपन्न झाले. बिघडलेल्या समाज व्यवस्थे मध्ये समाजात सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या रोजच्या वाईट घटना बघता आपल्या मुली सुरक्षित नाहीत. रोज काहींना काही मुलींच्या बाबतीत अत्याचारच्या बातम्या ऐकायला पाहायला मिळत आहेत. अशा वेळेला आपण प्रत्येक पालकांची जवाबदारी आहे की त्यांनी स्वराक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. हाच संदेश समाजास देणे करिता व कराटे प्रशिक्षण अशा वेळेला किती महत्वाचे आहे हे पटवून देणेकारिता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना या जागतिक महामारीचे संक्रमण व निर्बंध यांचे पालन करून या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
सोबत आपल्या मातीतील प्राचीन युद्धकला जी युद्ध कला छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळा पासून चालत आली आहे. स्वराज्य निर्मिती मध्ये ह्या युद्धकलेचा वापर करण्यात आला होता. अशा शिवकालीन युद्धकलेचा प्रचार आणि प्रसार आपल्या विभागात व्ह्यावा. हेच मानस डोळ्यासमोर ठेऊन आज बोर्लीच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळ जे गेली 30 वर्षे सदर उत्सव साजरा करीत आहेत अशा बापाच्या समोर चॅम्पियन कराटे क्लब तर्फे कराटे आणि शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. बोर्ली, दिवेआगर, म्हसळा आणि श्रीवर्धन अशा शाखेतील एकुण 50 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चॅम्पियन्स कराटे क्लब चे संस्थापक शिहान संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सेन्सई रितेश मुरकर,सेन्सई अविनाश मोरे,सेन्सई प्रसाद विचारे आणि सेन्सई अभय कळमकर यांच्या प्रशिक्षणाखाली तसेच बोर्ली दिवेआगर येथील प्रशिक्षक सेन्सई अनिकेत साखरे आणि सेन्सई कृथार्थ कोलथरकर यांच्या उत्कृष्ट नियोजना अंतर्गत सदर कार्यक्रम खुप यशश्वी रित्या पार पडला.युक्ता मुरकर,सिद्धी सावंत श्रुतिक वाणी, मयूर तांबे, महेश्वरी येलवे, मानस भट, धनश्री तोडणकर, स्मरणीका भुते समवेत सर्व विध्यार्थ्यानी उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणें फेडले . त्या वेळी गणेश मंडळाकडून उपस्थित विध्यार्थ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले.सध्याच वातावरण बघता बोर्ली दिवेआगर मधील जास्तीत मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याचे आव्हान प्रशिक्षक रितेश मुरकर सर यांच्या कडुन करण्यात आले.