Type Here to Get Search Results !

🛑पर्यटकांना वाचविताना देवकुंडवरील गाईड चा बुडून मृत्यू.


🛑पर्यटकांना वाचविताना देवकुंडवरील गाईड चा बुडून मृत्यू.

रायगड वेध माणगाव-प्रतिनिधी गिरीश गोरेगावकर

       माणगांव तालुक्यातील विळे पाटनुस विभागातील देवकुंड धबधबा या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडत आहेत.मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पुण्याहुन आलेला पर्यटक कुंडलिका नदीमध्ये भिरा येथे गणेश विसर्जन घाटाजवळ बुडून मृत्यू झाला होता आणि ५ सप्टेंबर  सायंकाळीच्या ३ वाजण्याच्या सुमारास देवकुंड धबधब्यावरून परतणाऱ्या व पुणे येथून आलेल्या ४ पर्यटक परतत  असताना स्टारटिंग पॉईंट लाकडी पुलाजवळ  देवकुंड परिसरातील ओढ्यामधून पर्यटकांना बाहेर काढताना देवकुंड धबधब्यावरील चेन ग्रुप मधील गाईड दिलीप मोरे वय वर्षे ४६ रा.भिरा धनगरवाडी मूळ गाव मोरबा बौद्धवाडी हा रस्सी पकडून ओढा पार करणाऱ्या पर्यटकाना घेऊन येत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहत जाऊन गतप्राण झाला आहे. एकूण ४ पर्यटक सोबत असताना महिला पर्यटक बुडत असताना तिचे प्राण वाचविण्यासाठी गेलेला गाईडच गतप्राण झाला. व एक महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत.यावरून देवकुंड ची वाट किती भयानक आहे याची कल्पना बाकी पर्यटकांनी करून घ्यावी अशी परिस्थिती आहे.मागील १५ ते २० दिवसातील या ठिकाणी मानवी मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू  र जि नं ३१/२०२१ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे करण्यात आली आहे.व पुढील तपास सह्यायक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक कुंजन जाधव ह्या करीत आहेत.
       विशेष म्हणजे  या ठिकाणी जुलै महिन्या पासून कलम १४४ व जमावबंदी लागू करण्यात येते. आणि यावर्षी देखील इथे १४४ कलम लागू आहे.असे असूनही याठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने जिल्ह्याबाहेरील पर्यटक इथे येत आहेत.शासनाचे अध्यादेश धाब्यावर बसवून येथील धंदे राजरोसपणे व तेजीत चालू आहे.
      माणगाव तालुक्यातील एका टोकाला असणाऱ्या या ग्रामीण भागात केवळ आज या पर्यटकांमुळे दररोज लाख ते दीड लाखांची उलाढाल होत आहे.ग्रामपंचायत कडे विचारणा केली असता त्यांचा ह्या गोष्टीशी काहीच संबंध नाही असे सांगण्यात आले आहे. मग पर्यटकांनाआणि या सर्व गोष्टी अशाच  घडत असताना सहा प्रशासन मूग गिळून गप्प का? आणि अनधिकृत धंद्यांना पाठबळ नक्की कुणाचे आहे?यातील सर्व नफ्याचा हिस्सा नकी जातो कुणाचा आहे.?
     आणि आगामी काही दिवसात या सर्व बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी उपोषणाला बसणार आहेत आशि माहिती देखिल प्राप्त झाली आहे.
देवकुंड  जर बंद झाला नाहीतर अजून किती लोकांचे बळी जाणार ?असा गहन प्रश्न येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.देवकुंड हे पुरातन जागरूक देवस्थान आहे .याचे पावित्र्य राखण्याचे व त्याची दखल घेण्याची परिस्थिती आज निर्माण आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test