Type Here to Get Search Results !

🛑विद्यार्थी वसतीगृहासाठी कुणबी समाजोन्नती संघाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश सुपूर्द


🛑विद्यार्थी वसतीगृहासाठी कुणबी समाजोन्नती संघाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पाच कोटींचा धनादेश सुपूर्द
 
रायगड वेध म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती त्यानुसार पाच कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे एका विशेष समारंभात सुपुर्द् करण्यात आला. 
  कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक विकासासाठी राज्यसरकार बांधील आहे. कुणबी, ओबीसी समाजबांधवांसह विविध समाजघटकांसाठी कार्यरत विकास महामंडळांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून त्यानुसार निधी उपलब्ध केला जात आहे. नवीन घटकांना आरक्षण देत असताना सध्याचे लागू असणाऱ्या मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याची काळजी सरकार घेईल अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील कुणबी समाजबांधवांच्या मुलांना मुंबईत शिक्षण घेत असताना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची व त्यासाठी पाच कोटींचा निधी राखून ठेवल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती त्यानुसार मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाला मुलुंड येथे कुणबी विद्यार्थी वसतीगृह बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय जुलै मध्ये घेण्यात आला त्या पाच कोटींच्या निधीचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सह्याद्री अतिथीगृहात विशेष समारंभात सुपुर्द करण्यात आला.
 यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड म्हसळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महेश शिर्के, आदींसह संघाचे पदाधिकारी, सभासद आणि कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे चालत राहण्याची आपली परपंरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब,आदरणीय शरद पवार साहेबांपासून उद्धवजी ठाकरे यांच्या पर्यंत राज्याच्या प्रत्येक प्रमुखाने ही परंपरा जपली आहे. विकासाची ही परंपरा यापुढेही कायम राहील. एका समाजाला मदत करताना,त्यांचे हक्क देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी राज्यसरकार घेईल. मुलुंड येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून उभं राहत असलेलं हे वसतीगृह आधुनिक, आकर्षक, सर्व सोयी सुविधायुक्त असाव त्यांचे बांधकाम दर्जेदार व इमारतीत सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवावी. बांधण्यात येणारी इमारत पर्यावरण पुरक व शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असावी अशी अपेक्षा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.इमारतीच्या उभारणीत काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याच आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिलं. कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतीगृह असले पाहिजे, असा विषय उपमुख्यमंत्र्यांकडे खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली व अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. या संदर्भातला शासन निर्णयही तातडीने जारी करण्यात आला. त्या पाच कोटींच्या धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित दादांच्या वेगवान कार्यपद्धतीमुळेच हे काम तातडीने मार्गी लागत आहे, असे गौरवोद्गारही या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी काढले. मुंबईतील या वसती गृहाच्या माध्यमातून कुणबी विद्यार्थ्यांना मुंबईत राहण्यांसाठी हक्काची सोय उपलब्ध होणार आहे. वसतीगृहाचा उपयोग करुन समाजा तील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतील, जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वासही खासदार सुनिल तटकरे यांनी चेक प्रदान करताना व्यक्त केला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह विविध जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या शाखांचे उच्चशिक्षण,स्पर्धा परिक्षांची तयारीसाठी समाजोन्नती संघ व शासनातर्फे आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती यावेळी सघांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच वसती गृहाच्या उभारणीसाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.


" रायगडच्या पालकमंत्री आदीती तटकरे, खासदार सुनील तटकरे यानी रायगड सह ५ जिल्ह्यांतील कुणबी समाजासह राज्यातील कुणबी समाजाचे तरुण विद्यार्थीसाठी केलेले योगदान समाज कधीही विसरणार नाही"
महेश पांडूरंग शिर्के
संघ प्रतिनिधी- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, सरचिटणीस कुणबी समाजोन्नती संघ तालुका शाखा म्हसळा-मुंबई

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test