Type Here to Get Search Results !

🛑 फिनो पेमेंट बँकेच्या उपक्रमांतर्गत डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन🛑डिजिटल बँकिंग करणे सर्व ग्राहकांना अगदी सुलभ


🛑 फिनो पेमेंट बँकेच्या उपक्रमांतर्गत डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन

🛑डिजिटल बँकिंग करणे सर्व ग्राहकांना अगदी सुलभ 

रायगड वेध पेण प्रशांत पोतदार

फिनो पेमेंट बँकेच्या उपक्रमांतर्गत डिजिटल बँकिंग ला प्रोसाहन मिळत आहे. उदयोन्मुख भारतीय ग्राहकांसाठी फिटनेस बँकेने शहराच्या विविध फिनो बँकिंगने डिजिटल बँकिंग करणे सर्व ग्राहकांना अगदी सुलभ झाले आहे,कोव्हीड नंतर भारतीय डिजिटल बँकिंगमध्ये अधिक वेगाने अनुकूल बदल होत असतानाही डिजिटल बँकिंगचे अजून ही ग्राहकांना महत्व समजून आलेले नसल्याने फिनो पेमेंट बँकेच्या डिजिटल बँकिंगच्या क्यू आर कोड किंव्हा डेबिट कार्डद्वारे ग्राहक डिजिटल बँकिंग करण्यास सक्षम होणार आहे असे फिनो पेमेंट बँकेचे रिजनल हेड गौतम जाधव यांनी कार्यक्रमा प्रसंगी माहिती देताना सांगितले.

फिनोचे उद्दिष्ट्य हे ग्राहकांचे व्यवहार सुनिश्चित करणे आणि त्यांच्यातील डिजिटल बँकिंगची भीती दूर करून डिजिटल व्यवहाराचे फायदे समजावणे हा असून फिनो पॉइंटसवर,ग्राहक नवीन खाते उघडणे, घरगुती पैसे हस्तांतरण करणे,ठेवी मायक्रो एटीएम आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टीम द्वारे पैसे काढणे इतर उत्पादने आरोग्य विमा, पे युटिलिटी बिल आणि लोन ई एम आय या सारख्या सेवांचा लाभ त्वरित मिळणे आता सोपे झाले असल्या बद्दलची माहिती फिनो पेमेंट युनिट कडून देण्यात आली. 
यावेळी मॅनेजर मिलिंद खैरनार ,मॅनेजर मंगेश घोडके, मयूर झेमसे ,दत्ता मराठे विभूती इंटरप्राईजेस प्रियंका पाटील, हर्षल मात्रे, आशिष भगत, उर्मिला डेठे, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test