🛑सुके खोबरे व आरोग्याचे फायदे
टिम रायगड वेध
सुक्या खोबऱ्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत होते आणि त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे.
व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव - अनेक घरांत सुक्या खोबऱ्याचा (Dry Coconut) वापर नेहमी होत असतो. कोकणात खोबऱ्याचा जेवणात नेहमी वापर होत असते. तसेच खोबऱ्या वापर हा खीर, आइस्क्रीम, स्वीट डिश, मिठाई, मांसांहारी जेवणात मसाला बनवण्यासाठी केला जातो. खोबऱ्यामुळे अन्नाची चव वाढते होते. पण हेच सुके खोबरे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. वाळलेल्या नारळामध्ये भरपूर पोषक घटक देखील असतात. सुके खोबरे (Dry Coconut) हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते.
रक्तप्रवाह चांगला राहतो - सुक्या खोबऱ्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. नारळात फिनोलिक संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. ते शरीराच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतात. त्यामध्ये गॅलिक अॅसिड, कॅफीक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, P-Coumaric अॅसिडचा समावेश आहे.
लोहाची कमतरता दूर होते - खोबऱ्यामुळे लोहाच्या कमतरतेची समस्या दूर होते. सुक्या नारळामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते. शरीरातील लोहाची कमतरता ती खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि सेलेनियम हे प्रामुख्याने सुक्या खोबऱ्यात आढळतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते - रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण होते. सुक्या खोबऱ्यातील अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.
स्मरणशक्ती वाढते - कोरडे खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मानसिक आरोग्यासाठी सुके खोबरे खूप महत्वाचे आहे. अभ्यासामध्ये असे सांगितले गेले आहे की नारळाचे तेल अल्झायमर रोखण्यासाठी मदत करते.