Type Here to Get Search Results !

🛑भर पावसातही तळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी


🛑भर पावसातही तळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. परंतु अशा परिस्थितीतही गणेशोत्सवासाठी तळावासीयांचा उत्साह कायम राहिला असून मुसळधार पाऊस पडत असताना देखील तळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आठ ते दहा दिवस अगोदर पासूनच गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू व्हायची.परंतु गेल्या वर्षापासून कोरोना,लॉकडाऊन,निसर्ग चक्रीवादळ,यांसारख्या संकटांचा सामना करावा लागल्यामुळे अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना देखील बाजारपेठ परिसर ग्राहकांअभावी शांत होते.मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग पहायला मिळाली.नेहमी प्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार कोसळणाऱ्या वरुण राजाने यावर्षी देखील आवर्जून आपली हजेरी लावल्याने नागरिक घराबाहेर पडणार नाहीत असा अंदाज वर्तविला जात होता.परंतु आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करता यावी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी भर पावसात देखील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test