🛑गणेशोत्सवानंतर चाकरमानी लागले परतीच्या प्रवासाला
🛑तळा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर
आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावाला आलेले चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत.यामुळे तळा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी मोठ्या संख्येने नोकरी धंद्यासाठी व कामानिमित्त शहरांमध्ये स्थलांतरित झालेले नागरिक गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परतत असतात.यानिमित्ताने वर्षभरातून एकदा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सुखदुःखाच्या गोष्टी रंगतात.दैनंदिन जीवनातील आठवणींची देवाणघेवाण होते.गणेशोत्सव काळात पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा,आरती, भजन करून शेवटच्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देऊन पुढल्या वर्षी लवकर या असा आग्रह धरून चाकरमानी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत.यासाठी तळा बसस्थानकात बसमध्ये आपली आरक्षित केलेली जागा शोधण्यासाठी प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली.