Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवाची लगबग🛑बोर्ली पंचतन बाजारपेठे मध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी🛑आरास, पूजेच्या वस्तूंची दुकाने सजली🛑ढोलकी सजविण्याची लगबग🛑मूर्ती रंगकामाना वेग


🛑गणेशोत्सवाची लगबग

🛑बोर्ली पंचतन बाजारपेठे मध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी

🛑आरास, पूजेच्या वस्तूंची दुकाने सजली

🛑ढोलकी सजविण्याची लगबग

🛑मूर्ती रंगकामाना वेग

रायगड वेध अभय पाटील

गणरायाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे श्रीवर्धन शहरासह बोर्ली पंचतन बाजारपेठेमध्ये सर्वत्र गणपतीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बोर्ली पंचतन बाजरपेठेमध्ये सजावटीच्या वस्तू , पूजेच्या साहित्याचे स्टॉलची दुकाने, घराचे रंगकाम साहित्य व अर्थातच गणपती कारखान्यामध्ये मूर्ती रंगकाम लगबग सुरू असल्याचे दिसत आहेत. तर ढोलकी च्या दुकानावर देखील ढोलक, तबला, मृदुंग सजविणे व विक्री ची देखील धावपळ सुरू आहे. 
     
मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा आहे. हा सण आजकाल संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अन् दु:ख दूर होते, अशी भक्तांची धारणा आहे. यावर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी आहे. त्यामुळे १० सप्टेंबर या दिवशीपासून यावर्षी गणेशोत्सव सुरु होणार आहे. यातच मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे सण साजरे करताना आरोग्य प्रशासनाने निर्बंध आखले होते गतवर्षी अगदी साधेपणाध्ये गणेशोत्सव साजरा केला गेला होता परंतु आता 2021 मध्ये देखील कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी अधिक काळजी घेऊन उत्साहाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे . रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही विशेष निर्बंध घातले जाणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांनी करोना चाचणी करून यावे, अथवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
 श्रीवर्धन मध्ये व अगदी सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे या सणावर मर्यादा आली असली तरी गणेशभक्त या उत्सवासाठी खूप उत्साही आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे. लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवण्यावर असलेली बंधने आता शिथिल करण्यात आली आहेत. त्यातच अगदी दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे बोर्ली पंचतन बाजारपेठ गजबजून गेल्या आहेत. कोरोनाच्या त्रासाची भीती लोकांच्या मनात असली तरी त्यावर गणपतीच्या खरेदीने सध्या मात केली आहे.
 बोर्ली पंचतन बाजारपेठे मध्ये कपड्यांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने, मिठाईची दुकाने, घराच्या रंगणकाम साहित्यासोबतच आरास व शोभेच्या वस्तूंची, पूजा साहित्यांची दुकाने सजली असून ग्राहकांची देखील साहित्य घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्याच बरोबर गणेशोत्वस काळामध्ये आरती, भजने, शक्ती तुरा, संगीत मैफल यासाठी आवश्यक ढोलकी, तबला, मृदुंग यांच्या दुरुस्तीची व नवीन विक्री करणारी दुकाने यामध्ये देखील कामाची लगबग सूरु आहे. शाडूच्या गणपती मुर्ती घडविणाऱ्या कारखान्यामध्ये मूर्ती चे रंगकामांना वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test