Type Here to Get Search Results !

🛑प्राथमिक शिक्षक पवन आडवळे यांनी म्हसळा तालुक्याची शैक्षणिक परंपरा उंचावली, म्हसळा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे कौतुक


🛑प्राथमिक शिक्षक पवन आडवळे यांनी म्हसळा तालुक्याची शैक्षणिक परंपरा उंचावली 

🛑म्हसळा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे कौतुक 

रायगड वेध म्हसळा- प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणघर येथीलल शिक्षक पवन आडवळे यांची सोनी मराठी वर "कोण होणार करोडपती"या कार्यक्रमासाठी निवड झाल्याने त्यांनी म्हसळा तालुक्याची शैक्षणिक परंपरा उंचावली आहे. म्हसळा तालुक्यातील शिक्षक,शिक्षण विभागासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे.सोनी मराठी चॅनेलवर प्रक्षेपित झालेल्या "कोण होणार करोडपती" या कार्यक्रमात यशस्वी होऊन त्यांनी १२ लक्ष ५० हजार रुपये पर्यंतचे बक्षीस मिळविले आहेत.या यशाचे कौतुक गटविकास अधिकारी वाय.एन.प्रभे,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती ऊज्वला सावंत ,माजी उपसभापती मधुकर गायकर,जि.प.कृषी सभापती बबन मनवे,गट शिक्षण अधिकारी राजेश कदम,शिक्षक वर्ग नितीन माळीपरगे,अशोक सहाणे,गणेश अकोलकर,प्रशांत मोरे,महेंद्र गायकवाड,चंद्रकांत बैसाणे, अब्बास शेख,लाला लाडके आदी मित्र परिवार उपस्थित होते.
   प्राथमिक शिक्षक पवन आडवळे हे अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्या साठी परिश्रम घेत आहेत.आपल्या परिस्थि तीचा विचार न करता त्यांनी म्हसळा तालुक्यातील डोंगराळ भागातील कणघर येथील अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.ते एक उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू असून राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक वेळा मल्लखांब प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना मल्लखांब खेळा विषयी आवड निर्माण करून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल विजेते खेळाडू घडवलेआहेत.तसेच अशा गरीब मुलांसाठी ते आपल्या अतुल्य स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि सुविधा देत आहे.विद्यार्थी हेच आपले कुटुंब अशी धारणा समजून आपले काम उत्कृष्ट करत आहेत.सध्या म्हसळ्यात सुद्धा त्यांनी आपल्या नवोपक्रम आणि खेळाडू घडवण्याचा मानस व्यक्त केला आहे.अशा हुशार,जिद्दी,कष्टाळू, प्रामाणिक, शिक्षकाला नुकत्याच सोनी मराठी चॅनेलवर प्रक्षेपीत झालेल्या कोण होईल करोडपती या मालिकेत जाऊन म्हसळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि म्हसळा तालुक्याचा नावलौकिक केला. म्हसळा हा गुणवंत, कलावंताचा तालुका आहे हे पुन्हा सरांच्या रूपाने सिद्ध केले.अशा शिक्षकाला तमाम म्हसळा वासीयांच्या वतीने कौतुक केले, आणि त्यांचा गौरव करण्यात आला. म्हसळा शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा ही देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test